खडसंगी येथे मोफत आरोग्य शिबीर, शेकडो रुग्णांणी घेतला लाभ
खडसंगी येथे मोफत आरोग्य शिबीर,
शेकडो रुग्णांणी घेतला लाभ
शुभम बारसागडे/ नेरी (चिमूर):
चिमूर तालुक्यातील मांसल मदनापूर जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य गजानन बुटके व हिलिंग टच मल्टीस्पेशालिटी हास्पिटल चिमूर यांचे संयुक्त विद्यमाने खडसंगी येथील ग्रामपंचायत परिसरात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मोफत आरोग्य शिबिराचे उदघाटन जीप सदस्य गजानन बुटके यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थिती म्हणून हिलींग टच चे संस्थापक साईनाथ बुटके, सरपंच यशोदा ताराळे, ग्राम पंचायत सदस्य ओंकार चिंचालकर,नाना मेश्राम, बबन कुबडे,सचिन पचारे,सुनील कुडवे,सुनिल धाबेकर, बंडू रणदिवे,राजेंद्र लागडे, संदीप गुडध्ये,तानाजी नागोसे,दत्तू देव्हारे,डॉ व हिलींग टच चे कर्मचारी उपस्थित होते
शिबिरात खडसंगी परिसरातील,रेंगाबोडी, आमडी,वाहांगाव, बोथली, खानगाव, पंढरपौणि, मुरपार,भांसुली, मजरा,आदी गावातील रुगणाची तपासणी डॉ प्रमोद धोडरे,डॉ प्रिया धोडरे,डॉ दामिनी गंधारे,डॉ तनुजा गोहणे यांच्यासह परिचारिका प्रेमीला रंगारी,माधुरी रोकडे, निकिता रामटेके व औषधी वितरक वैशाली कारेकार आदींनी गरजू रुग्णांची संपूर्ण आरोग्याची तपासणी सह ब्लड प्रेशर, शुगर,इसिजी,तपासणी करून गरजू रुग्णाणा मोफ़त औषधी वाटप करण्यात आली या शिबिराचा लाभ अनेक रुग्णांणी घेतला शिबिराच्या यशस्वीतते साठि कार्यकर्ते सह हिलींग टच कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!