अतिक्रमण धारकांना भोगवटा कर लावण्याचे दिले मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन

अतिक्रमण धारकांना भोगवटा कर लावण्याचे दिले मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन 


न.प.सभापती नितीन कटारे यांना दिलेल्या लेखी आश्वाशनाने तोडले उपोषण 



चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )


चिमूर : - चिमूर नगर परिषदेच्या मनमानी करभाराने जनता त्रस्त झाली असल्याने विविध समस्या व प्रश्न सुटत नसल्याने न.प.बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी न.प. समोर साखळी उपोषण दि. १५/०७/२०१९ ला  सुरू केले असता दुसऱ्या दिवशी १६/०७/२०१९ ला मुख्याधिकारी शाह यांनी उपोषण मंडपास भेट देऊन सातही मागण्यांवर आश्वासन देत उपोषण सोडण्या करिता सांघीतले पण बांधकाम सभापती नितीन कटारे यांनी  आश्वासन हे लेखी लिहून दया असे मुख्याधिकारी यांना सांगितले आणि त्याच प्रमाणे  उपोषण संदर्भातील मागण्या मंजूर करवून घेत भोगवटा कर लावण्यासाठी लेखी आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले.नगर परिषद अंतर्गत विविध समस्या प्रलंबित असल्याने त्यात अतिक्रमण धारकाच्या जागेला भोगवटा कर लावणे ,मच्छर फवारणी ,अस्वच्छता असणे ,घरकुल विषयी प्रकरण ,आदी मागण्या संदर्भात साखळी उपोषण होते.दुसऱ्या दिवशी मुख्याधिकारी मनोजकुमार शाह यांनी भेट देऊन मागण्या संदर्भात चर्चा केली. 
भोगवटा कर एक महिन्याच्या आत लावण्याचे लेखी आश्वासन दिले. तर इतर मागण्या पूर्ण करणार असल्याचे सुद्धा सांगितले 
साखळी उपोषणात अतिक्रमण धारक रतन ठवळे गुलाब रामटेके गोटे   प्रशांत घुगुस्कर  शबाना पठाण शेख, मोहिणकर,मेश्राम ,लांडे, राणे, ढोणे आदी शेकडो जनता यावेळी उपस्थित होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!