शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी नवीन कल्पक प्रयोगांची आवश्यकता- प्रा. डॉ. अजय पिसे
शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी नवीन कल्पक प्रयोगांची आवश्यकता- प्रा. डॉ. अजय पिसे
(नेरी/चिमूर) शुभम बारसागडे
गेल्या कित्त्येक वर्षांपासून आपल्याकडील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास पूर्णतः खुंटलेला आहे, नैसर्गिक रित्या परिपूर्ण असूनही राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी-आत्महत्येच्या बाबतीत आपण भारतात पहिल्या क्रमांकावर आहोत. याउलट पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांनी नवीन संकल्पना राबवून पूर्ण बदल केला आहे आणि त्यामुळेच त्यांची आर्थिक क्षमता वाढलेली आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. अजय पिसे यांनी नेरी येथे शेतकऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेमध्ये केले.
पंतप्रधान कृषी-कौशल्य विकास योजने अंतर्गत आयोजित गटशेती या विषयावर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की पारंपारिक शेती, योग्य माहितीचा अभाव, मार्केट मधील मागणी व पुरवठा यांच्या अपुऱ्या नियोजनामुळे आपल्याकडे शेतीविषयी उदासीनता तयार झाली आहे, यात बदल हवा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता शेतीसोबत पूरक उद्योग उभारून आपला आर्थिक विकास केला आहे. चंदन रोपवाटिका व टोम्याटो सॉंस च्या यशस्वी प्रयोगामुळे शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळू शकते हे आम्ही सिद्ध करून दाखविले आहे आता याची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा मिळावा यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू असे आवाहन प्रा. डॉ. अजय पिसे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून श्री निलेश राठोड यांनी शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने धान लागवड व त्यामध्ये येणारया अडचणी यावर मार्गदर्शन केले. श्री सुरेश काळे यांनी शेतकऱ्यांना कपासी वरील लागवड व उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री नितेश सावसाकडे यांनी केले. या कार्यक्रमाल यशस्वी करण्याकरिता जगदीश सुकारे, माणिक पिसे भीमराव कामडी, दिवाकर पिसे, सुनील चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!