खुटाळा येथे शालेय वर्गखोली तसेच पाट बंधारा दुरुस्तीकरण चे भूमिपूजन

खुटाळा येथे शालेय वर्गखोली तसेच पाट बंधारा दुरुस्तीकरण चे भूमिपूजन

 नेरी/चिमूर (शुभम बारसागडे)

नेरी येथून जवळच असलेल्या खुंटाळा येथील जी.प. शाळेच्या नवीन वर्गखोली चे भूमिपूजन या क्षेत्राचे जी.प. सदस्य मनोज मामीडवार यांच्या हस्ते दिनांक ५ मार्च ला पार पडले.

राज्याचे अर्थ व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषद चंद्रपूर ला जिल्हातील शाळा विकसित करण्यासाठी शिक्षण निधी उपलब्ध करून दिला आहे. याच निधी अंतर्गत नेरी जी.प सदस्य मनोज मामीडवार यांनी मागणी करून नेरी क्षेत्रांतील खुटाळा येथील जी.प शाळेला २ नवीन वर्गखोली मंजूर करून घेतली. एका वर्गखोलीचे बांधकाम सुरू असून दि. ५ मार्च ला नवीन वर्गखोली व सिंचाई विभाग निधी अंतर्गत पाट बंधारा दुरुस्तीकरण भूमिपूजन पार पडले. यावेळी पं. स. सदस्य नर्मदा रामटेके, उपसरपंच गुणवंता गायकवाड, सचिव ढोरे, सदस्य माधुरी बारसागडे, मुख्याध्यापक कऊरके, शाळा व्य.स. अध्यक्ष शामकुरे, उपाध्यक्ष विनोद बारसागडे, सुनील तालेवार, अतुल शेंडे, प्रफुल वाघमारे, नितेश श्रीरामे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!