ब्रम्हपुरी तालुक्यातील वाघाच्या समस्येवर आयोजित चर्चा सत्राला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद माजीआमदार प्रा.अतुल देशकर
ब्रम्हपुरी तालुक्यातील वाघाच्या समस्येवर आयोजित चर्चा सत्राला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
माजीआमदार प्रा.अतुल देशकर यांचा पुढाकार
ब्रम्हपुरी - प्रतिनिधी
स्वप्नील अलगदेवे
ब्रम्हपुरी : - मागील एका वर्षात ब्रम्हपुरी तालुक्यातील चिचगाव , वांद्रा , डोर्ली,आवळगाव, हळदा, मुडझा, बल्लारपूर, एकारा, भुज, नवेगाव या परिसरात पट्टेदार वाघा सह बिबट्यांचा धुमाकूळ वाढला आहे . यात पाळीव प्राण्यांसह मनुष्याला सुद्धा प्राण अनेकदा गमवावे लागले आहे. अनेक पाळीव प्राणी व मनुष्य वाघाच्या हल्ल्यात जखमी झाले आहेते. वाघाच्या वाढलेल्या या दहशतीमुळे गावकऱ्यांमध्ये रोष व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या पुढाकाराने गंगालवाडी येथे वन विभागाच्या वतीने या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चा सत्राला वन विभाग चंद्रपूर चे मुख्य वनसंरक्षक एस.व्ही.रामाराव, ब्रम्हपुरी उप वनसंरक्षक कुलराज सिंह, ब्रम्हपुरीचे ठाणेदार मकेश्वर साहेब उपस्थित होते. या चर्चा सत्राला मार्गदर्शन करतांना, राज्याचे वन मंत्री मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार, महाराष्ट्र शासन व वन विभाग या समस्येवर उपाय काढण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रा.अतुल देशकर यांनी सांगितले. पुढे बोलतांना प्रा.अतुल देशकर यांनी गावकऱ्यांना कोणत्याही विरोधी नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन केले. व गावकऱ्यांनी या समस्येत संयम राखून वन विभाग व पोलीस विभागाच्या कामात सहकार्य करावेे असे आवाहन केले. या चर्चा सत्रात परिसरातील गावकऱ्यांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विविध उपाय सूचविले. प्रसंगी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्या उपाय योजना शक्य आहेत त्या सर्व लवकरात लवकर करू असे आश्वासन गावकऱ्यांना दिले. या चर्चा सत्राला मानद वन्य जीव रक्षक विवेक करंबेळकर,पं.स सदस्य रामलाल दोनाडकर, पं.स सदस्य सुनीता ठवकर,पं.स सदस्य निलकंठ मानापुरे, गांगलवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर भोयर यांच्या सह वन विभागाचे कर्मचारी, वन कामगार, प्रत्येक गावातील सरपंच, पोलीस पाटील, परिसरातील तंटामुक्ती अध्यक्ष, गाव वन समितीचे सदस्य यांच्या सह परिसरातील ३८ गावातील गावकरी उपस्थित होते. या विशेष पुढाकाराबद्दल माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांचे सर्व स्तरांवरून व गावकऱ्यांकडून अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!