सिंदेवाही तहसीलमध्ये गौन खनिजांचे भरलेला हायवा ट्रक जप्त
सिंदेवाही तहसीलमध्ये गौन खनिजांचे भरलेला हायवा ट्रक जप्त
(प्रशांत गेडाम )
सिंदेवाही :- -सिंदेवाही तालुक्यात गौण खनिजाचे अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याने (हायवा) ट्रक क्र.- MH- 34 ,BG- 3960 सिंदेवाही तहसील कार्यालय परीसरात जप्त केला आहे .ही कारवाई नव्यानेच आलेल्या तहसील कार्यालय सिंदेवाही येथे तहसीलदार श्री .अमोल पाठक यांनी केले.
सविस्तर वृत्त असे की तहसीलदार अमोल पाठक साहेब व नायब तहसीलदार सलामे यांचासोबत सिंदेवाही तालुक्याची पाहनी करीत असताना . दुपारी 11;- 45 वाजता मौजा मुरमाडी कळमगाव फाटा दरम्यान गौण खनिज गिट्टी भरून हायवा ट्रक क्रंमाक - MH-34, BG-3960 येताना दिसला . त्या हायवा ट्रक ला थांबवले असता चालकाने गौण खनिजाची जावक पावती संशयास्पद दाखवले असल्यामुळे तो हायवा ट्रक जप्त करण्यात आला आहे. वाहन चालकाला मालकाचे नाव विचारले असता त्याने हायवा ट्रक वाहनमालक नाव- पुरुषोत्तम आनंदराव वासेकर रा. डोंगरगाव तालुका मुल यांच्या मालकीचे आहे असे सांगितले .
त्या जप्त केलेल्या हायवा ट्रक यावर तहसील कार्यालय सिंदेवाही ने 2 लाख 58 हजार 400 रुपये दंड आकारण्यात आला असुन .असा प्रस्ताव चिमूर उपविभागीय कार्यालय मध्ये पाठवण्यात आला आहे. तसेच ही कारवाई महसूल अधिनियम 1966 चे नुसार 48 (7) नियमाचे उल्लंघन केल्यामुळे जमीन महसूल अधिनियम लावण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!