स्वच्छ भारत अभियानात मूल नगर परिषद देशात पहिली
मूल (अमीत राऊत)
केद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध उपक्रम राबवून चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल शहराने देश पातळीवर उत्तुंग भरारी घेतली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2019 स्पर्धेत तिसरा क्रमांक तर एक लाख लोकसंख्येच्या गटातून कचरामुक्त शहर स्टार रेटींग मध्ये मूल शहर देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
मूल नगर परीषदेने स्वच्छता अभियान दरम्यान अनेक प्रेरणादायी उपक्रम रावबवून लोकसहभाग वाढविला. केंद्र सरकारने दिलेल्या निकषांचे तंतोतंत पालन करून दमदार कामगिरी केली. एक लाख लोकसंख्येतील नगर परीषदांसाठी घनकचरा व्यवस्थापन,स्वच्छता अॅपवरून तक्रारींचे निवारण आणि कचरामुक्त शहर असे वर्गिकरण करण्यात आले होते. नगर परीषदेने प्रभागनिहाय नगरीकांना प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृतीपर नाविण्यपुर्ण सभा घेतल्या होत्या.
एक लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील 4 हजार 237 शहरांचे स्वच्छ सर्वेक्षण झाले. यात स्वच्छ सर्वेक्षण 2019 स्पर्धेत तिसरा क्रमांक तर एक लाख लोकसंख्येच्या गटातून कचरामुक्त शहर स्टार रेटींग मध्ये मूल शहर देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
दिल्ली येथे विज्ञान भवणात पार पडलेल्या पुरस्कार सोहळयात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हस्ते व आवास व शहरी कार्यमंत्रालय भारत सरकारचे राज्यमंत्री हरदिप एस. पुरी, स्वच्छ भारत मिशन अर्बनचे निर्देशक, संयुक्त सचिव विनोदकुमार जिंदाल यांचे उपस्थितीत पुरस्कार देण्यात आले.
पुरस्कार स्वीकारतांना मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर,उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, नगरसेवक प्रशांत लाडवे, मुख्याधिकारी विजुयकुमार सरनाईक, आरोग्य निरीक्षक अभय चेपुरवार उपस्थित होते.

