युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष गौतम पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली बाळापूर तळोधी व मिंडाळा येथे चलो पंचायत अभियान संपन्न
युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष गौतम पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली बाळापूर तळोधी व मिंडाळा येथे चलो पंचायत अभियान संपन्न
चिमूर - प्रतिनिधी
विलास मोहिनकर
चिमूर : - दिनांक.०७/०३/२०१९ ला युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष गौतम पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली बाळापूर तळोधी व मिंडाळा येथे चलो पंचायत अभियान कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी गौतम पाटिल यांनी युवा कार्यकर्त्यांनी एकजूट व एकत्र येऊन या चलो पंचायत अभियानामध्ये जास्तित जास्त संखेनी उपस्थिती दर्शवित जनजागृती अभियानास सहकार्य करावे जेणे करून या भाजप सरकारनी जनतेला नेहमी आश्वासन देऊन जनतेची मागील ५ वर्षांपासून दिशाभूल केलेलं आहे हे या चलो पंचायत अभियानामध्ये आपल्याला समस्त जनतेला दाखवून दयायचे आहे.व याकरीता संपूर्ण भारतात चोलो पंचायत मोहीम हि गोवो - गावी शहरात राबविल्या जात आहे.या कार्यक्रमास उपस्थित चिमूर विधानसभा अध्यक्ष युवक कांग्रेस गौतम पाटिल , नागभिड़ तालुका युवक कांग्रेस अध्यक्ष अमर नवघड़े , सौ. प्रणया गडम्वार पं.स. सदस्य मिंडाळा , आनंद भानारकर, स्वप्निल मुरस्कार , मुकेश रसरकर, व ईतर कार्यकर्ते गण आणी ग्रामस्थ उपस्थित होते.

