इलेक्ट्रिक खांब उतरविताना कामगारांचा अपघात १ ठार तर १ गंभीर जखमी


इलेक्ट्रिक खांब उतरविताना कामगारांचा अपघात १ ठार तर १ गंभीर जखमी

चिमूर - प्रतिनिधी
     विलास मोहिनकर

चिमूर : - दिनांक.०७/०३/२०१९ शंकरपुर येथून जवळच असलेल्या चकजाटेपार येथे ट्रॅक्टर वरुण इलेक्ट्रिक पोल खाली उतरविताना झालेल्या अपघातात १ कामगार ठार तर १ कामगार गंभीर जखमी झाला आहे हि घटना आज दुपारी १२:०० वाजता च्या सुमारास घडली असून शंकरपुर डोंगरगांव येथील रस्तयाने हिरापुर फिडर चि  इलेक्ट्रिक पोल टाकन्याचे काम सुरु आहे. हे काम जॅक्सन कंपनी ला असल्याची माहिती आहे.  आज चकजाटेपार येथे एका  ट्रॅक्टर वर आठ पोल होते है पोल उतरविन्यासाठी १० मजूर कामगार काम करीत होते. त्यातील ३ मजूर ट्रॅक्टर वर चढ़ले होते परन्तु ट्रॅक्टरवरील पोल अचानक  खाली घसरलयाने त्यात दोन मजूर दबल्या गेले. व त्यात  हिरापुर येथील जगन नामदेव नागोसे वय ३८ वर्षे यांचा घतनास्थळी जागेवरच मृत्यु झाला तर किटाळी येथील सुभाष रतिराम गायकवाड वय ३५ वर्षे हा मजूर कामगार गंभीर रित्या जखमी झाला असून त्या कामगाराला पुढील उपचारासाठी शंकरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत चिमुर येथील उप जिल्हा रुग्णालयात हलविन्यात आले आहे. पोलिसांनी पंचनामा केला. परन्तु कंपनी  कढून जोपर्यनत आर्थिक मोबदला  मिळनार नाही तो पर्यन्त मृतकाचे शवविचेदंन करणार नसल्याची भूमिका नातेवाइकां कडून वर्तविली जात आहे. बातमी लिहिपर्यंत वाटाघाटी सुरूच होत्या भिसी येथील ठानेदार झूमरे  व इतर पोलिस कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रात यावेळी उपस्थित होते.