जि.प.गटनेते व प.स.गटनेते यांच्या तक्रारीला मिळाले यश वाय.पि.कापगते ग्रामसेवक शुल्लक कारणावरून निलंबित राजकारणाचे बळी ठरले ग्रामसेवक

जि.प.गटनेते व प.स.गटनेते यांच्या तक्रारीला मिळाले यश

वाय.पि.कापगते ग्रामसेवक शुल्लक कारणावरून निलंबित

राजकारणाचे बळी ठरले ग्रामसेवक


 जांभुळघाट- प्रतिनिधी

              केवलसिंह जुनी


 चिमूर: - चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मांगलगांव ग्रामपंचायत येथे १ वर्षापूर्वी कार्यरत  असलेले   ग्रामसेवक वाय.पि.कापगते याची फरवरी २०१८ ला प.स.गटनेते रोशन ढोक यांच्या तक्रारीची दखल घेऊन  वि.अधिकारी यांचे अहवाल नुसार पापडकर यांनी मॊका चौकशी आणि कारणे दाखवा  नोटीस बजावली होती.व यानंतर मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रभार हाती घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची संधी न देता  जिएसटी बिल, सिमेंट रस्ता, एलईडी या कामात अनियमितता संदर्भांत चौकशी न करता शुल्लक कारणावरून ग्रामसेवक कापगते यांना निलंबित केले.शंकरपूर येथील लोकप्रिय नेते यांच्या माहिती नुसार जनतेला माहिती सादर केल्याने समस्त जनतेत याची चर्चा रंगली असून

ग्रामसेवक कापगते यांनी मौजा मांगलगांव येथे कार्यरत असतांना विविध शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला.आणि जनतेच्या समस्या सोडविल्या शौचालय व घरकुल करीता आर्थिक मदत ग्रामसेवक कापगते यांनी स्व:ता केल्या गेले असल्याचे जनते मध्ये बोलले जात आहे. अशा ग्रामसेवकास शुल्लक कारणावरून निलंबित केल्याबद्दल प.स.गटनेता व जि.प.गटनेता यांची मांगलगाव वासिय जनते तर्फे नाराजी व्यक्त केली जात आहे.या संपूर्ण प्रकारास राजकिय हेतुने बळीचा-बकरा बनवण्यात आल्याचे जनतेने केलेल्या वक्तव्यानुसार कळत आहे. शंकरपूर डोमा जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकाकंडुन सुद्धा या विषयी चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!