कन्हाळगाव च्या नदीवर संरक्षण भिंत बांधकाम चे झाले भूमिपूजन
कन्हाळगाव च्या नदीवर संरक्षण भिंत बांधकाम चे झाले भूमिपूजन
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रयत्नाला आले यश
शंकरपूर (जगदीश पेंंदाम)
चिमूर तालुक्यातील कन्हाळगाव येथील नदी मुळे पुराचे पाणी गावात येत असल्याने नुकसान होत असल्याने संरक्षण भिंत ची अत्यन्त गरज होती . तेव्हा भाजप तालुका महामंत्री विनोद अढाल यांनी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना गावकऱ्यांच्या माध्यमातून माहीती दिली असता आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी मंजूर करवून घेतले. नदी च्या संरक्षण भिंत बांधकाम चे भूमीपूजन भाजप तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शिवरकर यांच्या हस्ते झाले असून
तालुका महामंत्री विनोद अढाल उपस्थित होते.
यावेळी बूथ अध्यक्ष गणेश घरत ,प्रभाकर अंभोरे, कवडुजी अंभोरे, नथु घरत, दयाराम अंभोरे शालू अंभोरे,वंदना घरत,देवांगना चौधरी दर्शना वांडरे,दुर्गा श्रीरामे आदी महिला पुरुष उपस्थित होते
गावकऱ्यांनी आमदार बंटी भाऊ भांगडीया यांचे अभिनंदन करित आभार व्यक्त केले .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!