महावितरण कर्मचाऱ्यांवर कारवाई करा- पोरेड्डीवार यांची मागणी

मूल (अमीत राऊत)

विजबील भरणा केलेला असतांनाही अकारण विज पुरवठा खंडीत करून परत जोडणी करण्यासाठी पैश्यांची मागणी करणाऱ्या विजजोडणी कर्मचाऱ्यां विरूध्द कारवाई करण्याची मागणी डोंगरगाव येथील किरण पोरेड्डीवार यांनी विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या तक्रारीतुन मागणी केली आहे.पोरेड्डीवार यांच्या तक्रारीतून ते मुलांच्या शिक्षणासाठी मूल येथे कुटुंबासह राहत असल्याने डोंगरगाव येथील त्यांच्या घरातील विज वापराचे माहे जानेवारी ते फेब्रुवारी 2019 चे वीज बिल 540 रूपये आले होते.सदर बिलाचा भरणा करण्याची अंतीम मुदत 5 मार्च 2019 पर्यंत आहे.मात्र त्यापुर्वीच दिनांक 28 फेब्रुवारीला पोरेड्डीवार यांनी सदर बिलाचा भरणा दुपारी 3 वाजता केला.असे असतांना वीज वितरण कंपनीचे विजजोडणी कर्मचारी चन्ने यांनी आपल्या घराचा वीज पुरवठा खंडीत केल्याची माहिती दुपारी 4 वाजताच्या सुमारास पोरेड्डीवार यांना त्यांच्या शेजाऱ्याने भ्रमणध्वनीव्दारे दिली.व त्यावरून पोरेड्डीवार यांनी चन्ने यांना वीज पुरवठा खंडीत करण्याविषयी जाब विचारला असता वीज बिल भरणा केला नसल्या कारणाने विज पुरवठा खंंडीत केल्याचे आहे असे म्हणून विज पुरवठा पुर्ववत सुरू करण्यासाठी 200 रूपयाची मागणी केली पैसे न दिल्यास विज पुरवठा सुरू करणार नाही अशी धमकी दिली.चन्ने यांची ही बेमुर्वत मागणी मान्य करण्या शिवाय पर्याय नसल्याने पोरेडडीवार यांनी चन्ने यांना वीज पुरवठा सुरू करण्याची विनंती केली आणि आता आपण बाहेरगावी असल्याने गावात परत आल्यानंतर 200 रूपये देण्याचे कबुल केले. त्यानंतरच पोरेडडीवार यांचे घरातील विज पुरवठा सुरू करण्यात आला.पोरेडडीवार यांना आलेला अनुभव अनेक विज ग्राहकांना रोजच येत असतो मात्र कुणीही तक्रार करण्यास धजावत नाही त्यामुळे चन्ने सारख्या कर्मचा—याचे चांगलेच फावते विज वीतरण कंपनीतील विज कर्मचाऱ्यांच्या अशा वर्तणुकी विरोधात कारवाई करून आपल्या ग्राहकांना नाहक होणाऱ्या त्रासापासुन मुक्ती दयावी अशी मागणी किरण पोरेडडीवार यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!