६ मार्च रोजी "श्रमिक जनतेचा जाहीरनामा" परिषद आयोजित
६ मार्च रोजी "श्रमिक जनतेचा जाहीरनामा" परिषद आयोजित
चिमूर - प्रतिनिधी
विलास मोहिनकर
चिमूर : - सामान्य जनतेचे प्रश्न लक्षात घेऊन दिनांक.६ मार्च २०१९ रोजी शिवाजी मंदिर, दादर, मुंबई येथे श्रमिक जनतेचा जाहीरनामा परिषदआयोजित केला आहे. या परिषदेला सर्व कामगार संघटना चे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कष्टकरी जण आंदोलनाचे संयोजक सुरेश डांगे यांनी केले आहे.
जगण्याच्या हक्काचे आंदोलन मार्फत"श्रमिक जनतेचा जाहीरनामा"परिषद ६ मार्च २०१९ रोजी शिवाजी मंदिर, दादर, मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे, या परिषदेमध्ये सर्व श्रमिकांच्या मागण्या - लोकशाही संवर्धन, निवडणूक सुधारणा, सामाजिक उत्तरदायीत्व, शेतीतील श्रमिकांच्या सन्मानाने जगण्यासाठी मागण्या, पाणी दुष्काळ, सिंचन धोरण, पर्यावरण रक्षण,, शहरी विकास (अंतर्गत निवारा, विस्थापन पुनर्वसन धोरण, पाणी, शहर नियोजन), असंघटीतक्षेत्र व कामगार, अन्न सुरक्षा, जनतेचे पोषण हक्क, आरोग्य सेवेचे हक्क, शिक्षण हक्क, पर्यावरण स्नेही विकास धोरण, कष्टकरी महिला, ट्रान्स जेन्डर यांचे हक्क, मुस्लीम,दलित, आदिवासी, भटके विमुक्त यांच्यासाठी धोरण, स्थानिक आणि राज्य परिवहन वाहतूक धोरण, रोजगार, पेन्शन, आणि पैसा आणायचा कुठून या सर्व मुद्यांवर श्रमिकांचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.
या परिषदेत मार्गदर्शक म्हणून उल्का महाजन, धनाजी गुरव, सुरेश डांगे, अभय शुक्ला मुक्ता श्रीवास्तव, विलास भोंगाडे, डॉ गणेश देवी सुनीती सु. र., अनंत फडके अविनाश कदम, प्रियदर्शी तेलंग, शिराज प्रभू, सुभाष लोमट,शुभा शमीम, कुमार शिराळकर, सीमा कुलकर्णी, अजित नवले, चंदन कुमार, विश्वास उटगी, रवी दुग्गल, शंकर पुजारी, मेधा थत्ते, एम.ए. पाटील, सुजाता गोठोसकर, ब्रायन लोबो, चंद्रकांत यादव, मयुरेश भडसावळे,, हनुमंत ताठे, हसीना खान, मारुती भापकर, जोस अंतोनी जोसेफ, बिलाल खान, सीताराम शेलार,माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आपल्या सगळ्या मागण्या सर्व राजकीय पक्षापर्यंत पोहचवण्यासाठी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना शेवटच्या सत्रात आमंत्रित केले आहे, या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेश डांगे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!