शहिद झालेल्या सैनिकांसाठी समर्पित
शहिद झालेल्या सैनिकांसाठी समर्पित
एक श्याम शहिदोके नाम कार्यक्रम
मूल (अमित राऊत)
जम्मु काश्मिर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांसाठी समर्पित एक श्याम शहिदोके नाम कार्यक्रम नगर परीषद मूल, जनकल्यान शिक्षण संस्था मूल व संगित सम्राट हिरासुका म्युझिकल गृप मूल यांच्या संयुक्त विदयमाने मा.सा.कन्नमवार सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात शहिदांना श्रद्धांजली पर मशाल पेटवून नगर परीषद मूलच्या नगरराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला नगर परीषद मूलचे माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार, पत्रकार दिपक देशपांडे, युवराज चावरे, प्राचार्य विनोद बोलीवार, जणकल्याण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजू गेडाम, संगित सम्राट हिरासुका गृपचे अध्यक्ष राजेश संगेल आदी उपस्थित होते.
शहिदांना समर्पित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी देश संरक्षणासाठी भावी युवा पिठींनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याचे आव्हाहन केले. यावेळी बालविकास प्राथमिक शाळा मूल,माऊंट कॉन्व्हेंट कनिष्ठ महाविदयालय मूल व बल्लारपूर पब्लिक स्कुल मूलच्या विद्यार्थांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले.
तसेच संगित सम्राट हिरासुका म्युझिकल गृपच्या कलाकारांनी देशभगितीपर गिते सादर करून भावपुर्ण वातावरणाची निर्मिती केली. निशुल्क असलेल्या या कार्यक्रमात नागरीकांची चांगलीच उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन अमोल वाळके व बंडू अल्लीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विजय पेंदोरकर, अरविंद मेश्राम, चिदानंद सिडाम,निखील जिरकुंटवार, मनोहर कन्नाके,मिस पुजा, मिस मयुरी, प्रियंका, विनोद बोर्डावार,अभिजित राखडे, आशिष सालोरकर आदींनी मेहनत घेतली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!