बिबट्याचा वावर- जनजागृती - यश कायरकर
जनजागृती
१. बिबट वावर क्षेत्रात वावरतांना हातात घुंगराची काठी, टॉर्च व मोबाइलला किंवा रेडिओवर गाणी वाजवावी जेणेकरून बिबटला तुम्ही येण्याची चाहूल लागेल व त्याचा मार्ग बदलेल व संघर्ष होणार नाही.
२. बिबट वावर क्षेत्रात उन्हाळ्यात घराबाहेर, उघड्यावर किंवा अंगणात झोपू नये. (अंगणाला जाळीचे बंदीस्थ कुंपण घालणे योग्य)
३. बिबट वावर क्षेत्रात उघड्यावर सौचास जाऊ नये. सौचालाय चा वापर करावा.
४. ऊसाची लागवड करतांना ऊस हा घराला अगदी खेटून लाऊ नये, घर ते ऊस हे अंतर कमीत कमी २५ ते ३० फूट असावे.
५. बिबट वावर क्षेत्रात लहानमुलांवर विशेष लक्ष द्यावे. मुलाला एकटे अंगणात किंवा बाहेर सोडू नये. मुलांसोबत कोणीतरी नेहमी असावे.
६. बिबट वावर क्षेत्रात घरासमोरील अंगणाला चारीही बाजूने बंदीस्थ जाळीचे कुंपण घालावे जेणेकरून मुलांना खेळता येईल.
७. बिबट पाळीव प्राण्यावर हल्ला करून खाण्यासाठी येतो त्याकरिता उपाय म्हणून बंदीस्थ गोठा करावा जेणेकरून पाळीव प्राणी सुरक्षित राहतील व त्याचे घराभोवती फिरणे बंद होईल.
८. बिबट वावर क्षेत्रात तुमच्या घराच्या आवती भोवती वाढलेले गवत व इतर झुडपे काढून स्वछ ठेवावे जेणेकरून त्याला लपून बसता येणार नाही.
९. बिबट वावर क्षेत्रात परिसर स्वछ ठेवावा. घाणीवर कुत्रे, डुकरे, उंदीर, घुशी, इ. प्राणी येतात व त्यामागे त्यांना खाण्यासाठी बिबट येतो.
१०. लहानमुलांनी शाळेत ये-जा करतांना समूहाने राहावे, तसेच गाणी किंवा मोठ्याने बडबड करीत जावे.
११. बिबट वावर क्षेत्रात घराच्या आजूबाजूस दिवे असावे.
१२. बिबट दिसल्यास पाठलाग करू नये, त्वरित वनविभागाला कळवावे. पाठलाग केल्यास तो परत फिरून हल्ला करू शकतो.
१३. शेतीची कामे करतांना खाली बसून करावी लागतात, बिबट वावर क्षेत्रात विशेष काळजी घ्यावी.
१४. ऊस तोडणीच्या वेळेला बिबट पिल्लं दिसल्यास त्वरित वनविभागाला कळवा. पिलांना हाताळू नये तसेच फोटो काढू नये.
१५. बिबट विहिरीत अडकल्यास त्वरित वनविभाग ला कळवा. गर्दी, गोंधळ करू नका.
१६. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला डीवचवू नका, फोटो काढू नका.
१७. बिबट्या संदर्भात अफवा किंवा चुकीच्या बातम्या पसरवू नका.
१८. बिबट वावर क्षेत्रात येणारे मेंढपाळ यांनी विशेष दक्षता घ्यावी.
१९. बिबट वावर क्षेत्रात येणारे ऊसतोडणी कामगार यांनी सुद्धा विशेष दक्षता घ्यावी.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!