व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सर्व स्तरावर सामुहिक प्रयत्न आवश्यक - बंडोपंत बोढेकर

व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सर्व स्तरावर सामुहिक प्रयत्न आवश्यक - बंडोपंत बोढेकर 

गडचिरोली (प्रतिनिधी ) - तंबाखू ,  मद्यपान यासारख्या व्यसनाकडे तरूणांचा वाढता कल लक्षात घेता बालपणापासून योग्य संस्कार , उत्तम सहवास , समुपदेशन याचबरोबर व्यसनी व्यक्तीवर योग्य उपचार व्हावे याकरिता समाजातील सर्व जबाबदार घटकांचे सामुहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे मत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी येथे केले. 

          भारतीय समाजशास्त्र विषयाच्या शताब्दीवर्षाच्या निमित्ताने एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन  'ड्रग अॕडीक्शन  ए मेन  प्राब्लेम  आॕफ  इंडियन सोसायटी इन करंट सिनॕरिओ' या विषयावर करण्यात आलेले होते.गडचिरोली  महिला महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग, गोंडवाना विद्यापीठ आणि विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषदेच्या संयुक्त सहकार्याने प्रस्तुत परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते. या परिषदेच्या दुसऱ्या टेक्निकल सत्रात प्रमुख वक्ते म्हणून ग्रामगीताचार्य बोढेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले, शासन आपल्या स्तरावर उत्तम कार्य करीतच आहे तरीसुद्धा वेगवेगळ्या ' एनजीओ 'नी याप्रश्नांकडे  विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सत्राचे  अध्यक्षस्थानी गो.वा.कला वाणिज्य महाविद्यालयाचे डाॕ . अशोक सालोटकर  होते . प्रमुख अतिथी म्हणून व्हि.एन.आय.टी.चे डाॕ . जी.एन. निम्बार्ते  , डाॕ .शरयु  गहेरवार, डाॕ . रविंद्र विखार  आदी उपस्थित होते . महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजन समितीच्या वतीने बंडोपंत बोढेकर यांना  शाल ,श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.  याप्रसंगी डाॕ . निंबार्ते  म्हणाले , व्यसनमुक्त समाज निर्माण करणे हे एक आव्हान असून भविष्यात सोशल मिडीया  च्या व्यसनाच्या संबंधात काम करावे लागणार आहे. महाविद्यालयाच्या स्तरावर त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी आढावा घेतला . सत्राचे अध्यक्ष डाॕ . सालोटकर  म्हणाले ,अलिकडे तरूण आहारापेक्षा व्यसनावर जास्त खर्च करीत असून आधुनिक जीवनशैलीचा बराच परिणाम त्यावर झाल्याचे दिसून येते . जीवनात जर  उत्तम संगत मिळाली तर  चांगल्या सवयीमुळे  आपण आरोग्यलाभ मिळवू शकतो , असे ते म्हणाले . प्रास्तविक आणि सूत्रसंचालन प्रा.डाॕ . विखार यांनी केले तर आभार डाॕ .स्निग्धा  कांबळे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!