सावली शहरात जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

सावली शहरात जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

सावली (प्रविण झोडे)

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. समान हक्क, न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षात महिलांनी मोठा लढा दिला. त्यामुळेच आज आपण स्त्रियांना विविध क्षेत्रात प्रगती पथावर पाहतो. तसंच महिलांची सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध स्तरावरील प्रगतीचा सन्मान या दिनानिमित्त करण्यात येतो. मात्र आपल्या आयुष्यातील प्रत्येक महिला आई, आजी, बहिण, मैत्रिण, बायको, मुलगी या सर्वांचाच सन्मान करण्याचा हा दिवस. त्यांनी आपल्यासाठी केलेल्या असंख्य लहान सहान गोष्टींची जाणीव ठेवून त्यांचा आदर करण्याचा हा दिवस. 

 जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून सावली शहरात स्पंदन सखी परिवार बस स्टँड ग्रुप च्या वतीने दी .८मार्च ते  १० मार्च 2019 ला तीन दिवशीय कार्यक्रम नगरपंचायत समोरील पटांगणावर  या स्थळी  आयोजित केलेला आहे .या तीन दिवशीय  कार्यक्रमात मराथान स्पर्धा व मिसेस सावली  सांस्कृतिक स्पर्धा आणी भव्य आनंद मेळाव्याचे आयोजन केलेला आहे .आज सकाळी 6 वाजता  मराथाण स्पर्धा घेण्यात आली त्या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.त्या स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग घेतला  होता .स्पंदन सखी ग्रुप च्या  उपक्रमाचा सावली शहरात कौतूक होत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!