चंद्रपुर गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णालय कामगारांच्या मागण्या केल्या मान्य - छोटुभाई यांच्या कार्याला मिळाले यश


चंद्रपुर गडचिरोली  जिल्ह्यातील रुग्णालय कामगारांच्या मागण्या केल्या मान्य
- छोटुभाई यांच्या कार्याला मिळाले यश

वरोरा - प्रतिनिधी
          आलेख रट्टे

वरोरा : - चंद्रपूर - गडचिरोली येथील असंघटित कामगार संघटनेच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकारी व गडचिरोली जिल्हाधिकारी. सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन दिनांक ०२/०३/२०१९ ला जिल्हा सहाय्यक  कामगार आयुक्त  गडचिरोली यांनी तातडीची बैठक बोलावली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक. आरोग्य  अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी व तीन ठेकेदार आणि संघटनेचे अध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती छोटू भाई शेख.सचिव अशोक बावणे इरफान भाई खान. हारुन भाई शंकर बोरघरे व शेकडो कामगार यावेळी उपस्थित होते.यावेळी संघटनेच्या वतीने कामगारांच्या खालील मागण्या बैठकीत उपस्थित करण्यात आल्या.
१) गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा व तालुकास्तरीय असलेल्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील मागील अनेक वर्षापासून कमी वेतनात सेवा देणारे सुरक्षा रक्षक सफाई वाहनचालक व इतर कामगारांचे भविष्य निर्वाह निधीचा भरणा न करता कमी वेतन देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून जिल्ह्यातील सर्व कामगारांना यापुढे भविष्य निर्वाह निधीचा भरणा करून शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे १० ते १८ हजार रुपये पर्यंत वेतन देऊन इतर सुद्धा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या.
२) शासनाच्या दिनांक.२७/११/२०१८ च्या चुकीच्या परीपत्रकामधे दुरुस्ती करून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याप्रमाणे आदिवासी बहल व नक्षलग्रस्त आणि ९० टक्के जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील २०० बेड रुग्णालयाला २४ तर १०० बेडला १२ व  ५० बेडला ६ सुरक्षारक्षक कामगार देण्यात यावे.सफाई व इतर सुद्धा कामगार संख्येत वाढ करून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे व सुरक्षारक्षक कामगारांची ऑनलाईन नोंदणी झाली असून सीएस कार्यालयामार्फत सर्व सुरक्षा रक्षक कामगारांचे एकत्रीत  नोंदणी करून कामगार बोर्ड तर्फे सर्वांना प्रशिक्षण देऊनत्यांचे समायोजन करण्यात यावे व आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व रुग्णालय करिता सुरक्षारक्षक सफाई कामगार संख्येत वाढ करण्याकरिता शासन व सहाय्यक संचालक मुंबई यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात यावे.
या मागण्या बैठकीत संघटनेच्यावतीने उपस्थित केल्या होत्या यावेळी जिल्हा कामगार अधिकारी श्री उईके यांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना केल्या यापुढे शासनाच्या किमान वेतन नियमाप्रमाणे बँक मार्फत वेतन व इतर सुविधा न दिल्यास कारवाई करण्यात येईल व तसेच जिल्हा शालेय चिकित्सक व आरोग्य अधिकारी यांनी वरील सर्व मागण्यांची पूर्तता करून कामगार बोर्डमार्फत नोंदणी करून सेवा देत असलेल्या कामगारांना कामावर समाविष्ट करून घेण्याची कारवाई सुरू केली असून यापुढे कमी वेतन देणाऱ्या  ठेकेदारांवर देयक थांबून कारवाई केल्या जाणार असे आश्वासन दिले यावेळी संघटनेचे पदाधिकारी व गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा व तालुकास्तरीय असलेले वडसा, अहेरी ,सिरोंचा ,कोरची, कुरखेडा ,आरमोरी ,चामोर्शी ,एटापल्ली, भामरागड सहीत इतर सुद्धा रुग्णालयातील शेकडो कामगार उपस्थित राहून छोटूभाई यांचे आभार व्यक्त केले.