शंकरपुर ग्रामपंचायत ला ग्रामविकास अधिकारी यांची प्रतिक्षा कर्तव्यदक्ष जि.प.सदस्य लक्ष देणार काय ?
शंकरपुर ग्रामपंचायत ला ग्रामविकास अधिकारी यांची प्रतिक्षा
कर्तव्यदक्ष जि.प.सदस्य लक्ष देणार काय ?
जांभुळघाट - प्रतिनिधी
केवलसिंह जुनी
जांभुळघाट : - चिमुर तालुक्यातील सुप्रसिद्ध डिजिटल ग्राम पंचायत शंकरपूर येथे मागील ३ वर्षापासून ग्रामविकास अधिकारी यांची प्रतिक्षा करावी लागत आहे. येथील प्रभार मागील कित्येक वर्षांपासून श्री.सी.एन.पाटील हे ग्रामसेवक सांभाळत आहेत.श्री. पाटील यांचेकडे हिरापुर,किटाळी,जवराबोडी,ह्या गावांचा प्रभार सुद्धा देण्यात आला आहे. शंकरपूर-डोमा जि.प.क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतीचा प्रभार पुढे मागे पाटील यांचेकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.शंकरपूर जि.प.क्षेत्राचे विद्यमान कर्तव्यदक्ष जि.प.सदस्य स्वतःच्या गावातील ग्रामविकास अधिकारयाचे पद न भरण्यामागे काही अवैध ठेकेदारी नातेवाईकाचे नावे चालविण्याचा तर उद्देश नसेल ना अशी शंका ग्रामवास्यांचा कडून उपस्थित केल्या जात आहे.

