महादेवाचा गजर करत चंद्रपूर ते मार्कंडा पददिंडी
80 किलोमिटरचा अंतर पायी चालणार
मूल (अमित राऊत)
पाऊले चालती मार्कंड्याची वाट, शिवभक्ती दाटूनी आली काठोकाठ.
दरवर्षी कोणी पंढरी तर कोणी काशी जातात परंतू चंद्रपूर जिल्ह्यातील भक्त मात्र आता विदभार्ची काशी म्हणून ओळखल्या जाणा—या मार्कंड्याला पदयात्रा काढत आहेत. गेल्या चार वर्षा पासून निता पुल्लीवार व चैताली खटी यांच्या नेतृत्वात त्यांच्या सोबत काही महिला व पुरूष चंद्रपूर ते मार्कंडा असा 75 ते 80 किलोमिटर अंतर हर हर महादेव म्हणत पायी चालत आहेत.
पंढरपूरच्या विठू माऊली ला पद वारीने जाण्यात जो आनंद आहे, तोच आनंद या पद वारीतून देवांचे देव महादेव मार्कनडेश्वराच्या दर्शनात मिळावा यासाठी चंद्रपूरच्या महिला व पुरूष भक्त दरवर्षी पददिंडी काढतात.
दर वर्षी प्रमाणे या वर्षी 28 फरवरी ते 4 मार्च पर्यन्त 5 दिवसीय पद दिंडीला सुष्वात झाली. 28 फरवरी ला सकाळी साडे 9 वाजता महाकाली मंदिर चंद्रपूर ते मार्कण्डा पद दिंडी निघाली. र्व भक्त गणांनी यात उत्साहाने आनंदाने सहभागी झाली होती. अनेक ठिकाणी मुक्काम करत ,मुक्कामी असलेल्या ठिकाणी न थकता नाचत गाजत गाणे गातात. ही पददिंडी मूलला पोहचतात काही महिलांनी पददिंडीत असलेल्या महिलांना हळदकुंकु लावत वारीचे स्वागत केले. यावेळी महिलांनी नाचत गाजत देवाची गाणी म्हणत महादेवाचा जयजयकार केला. 4 मार्च म्हणजेच महाशिवरात्रीला ही दिंडी मार्कंडा येथे पोहचते.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे भूषण असलेले चिरंजीव जागृत क्षेत्र श्री मार्कंडा उत्तरवाहिनी वैनगंगा नदी असलेले मनमोहक शिल्पकलेने नटलेले मार्कन्डेय ऋषींचे तपस्थल असलेला मार्कंडा असे हे अद्भूत शिवमंदिर मार्कंडा बघायला आपण वाहनांनी भेट देतोच पण पद वारी ने महादेवा ला भेटण्याचा आनंद काही निराळाच असल्याचे महिलांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!