2 व 3 मार्च ला विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन

2 व 3 मार्च ला विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन

सावली (प्रतिनिधी) प्रविण झोडे

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक- 2019 च्या पार्श्वभुमीवर मा. भारत निवडणुक आयोग यांचे निर्देशनानुसार सावली तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर दिनांक 2 व 3 मार्च रोजी विशेष मतदार नोंदणी मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोहीमेमध्ये मतदार केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून नागरीकांकडून मतदार नोदंणीकरीता अर्ज स्विकारणार आहेत. तरी ज्या मतदारांचे वय 18 वर्षे पुर्ण झालेले आहेत परंतु त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ नाही तसेच ज्या दिव्यांग व्यक्तीचे नाव मतदार यादीत नाही त्यांनी सदर दिवशी संबधीत मतदार केंद्रस्तरीय अधिकारांकडे तसेच तहसिल कार्यालय सावली येथे नमुना 6 फार्म भरुन अर्ज सादर करावा. तसेच ज्या मतदारांचा मतदार यादीतील तपशिलमध्ये दुरुस्ती करावयाचे आहे त्यांनी नमुना 8 भरुन सादर करावा. 

लोकसभा निवडणुक 2019 पुर्वी मतदार यादीत नाव समाविष्ठ करून संविधानाने दिलेल्या मतदारांना हक्क बजाविण्याची शेवटची संधी आहे. या संधीचा सावली तालुक्यातील सर्व नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार पुष्पलता कुमरे,नायब तहसीलदार सागर कांबडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!