13 हजार सिंचन विहरीचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
13 हजार सिंचन विहरीचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
शुभम बारसागडे (नेरी/चिमूर):
शासनाने नुकतीच १३ हजार धडक सिचन योजनेचा शुभारंभ केला असून जिल्ह्यातील सर्व शेतकरी अर्ज भरण्यासाठी धावपळ करीत असताना दिसून येत आहेत आणि जो सुरुवातीला आणलाईन अर्ज करेल त्याला ह्या योजनेची संधी मिळेल त्यालाच विहीर मंजूर होईल अशी शासनस्तरावरून अट घातली आहे. दि. २६ फेब्रु ला. अर्ज भरणे सुरू झाले. पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना आधार कार्ड, नमुना आठ अ व पासबुक ची मागणी करण्यात आली. मात्र लगेच दुसऱ्या दिवशी सातबारा जोडन्यात यावा असे मॅसेज शेतकऱ्यांच्या मोबाइल वर आले. सातबारा मागणी केल्या मुळे शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. जो तो सातबारा काढून अर्ज आणलाईन करू लागला. अचानक सातबाऱ्या च्या मागणीने शेतकऱ्या तारांबळ उडाली कुणी जुने सातबारा जोडले तर काहींना तलाठी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागले. कुणाला मिळाले तर कुणाला वंचित राहावे लागले. त्यातच मागील अनेक दिवसांपासून आणलाईन सातबारा ची वेबसाईट बंद किंवा लिंक फेल असल्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा मिळू शकले नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना तर खूप मोठी कसरत धडक मोहीमे साठी करावी लागली. आणि आता तर सातबारा ची लिंक फेल असल्यामुळे अनेक शेतकर्यांना या योजने पासून वंचित राहतील. अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे. तेव्हा या गंभीर बाबीची दखल घेऊन शासनाने काहीतरी उपाय योजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व सातबारा लिंक सुरू करून धडक योजनेच्या विहिरीसाठी आणलाईन अर्ज करायला मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!