मूल उपविभागीय कार्यालयावर आपचा मोर्चा

मूल (अमीत राऊत)

येथे आम आदमी पार्टी तर्फे बल्लारपूर,मूल, पोंभुर्णा विधानसभा क्षेत्र द्वारा मूल येथे शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन भव्य आंदोलनाचे आयोजन केले होते. 

    हा मोर्चा आम आदमी पार्टी कार्यालयाासून ते गांधी चौक ते मुख्य मार्गाने जात उपविभागिय अधिकारी कार्यालयावर धडकला.

    जबरानजोत शेतकऱ्यांना पट्टे मिळालेच पाहिजेै, स्वामीनाथन आयोगाच्या अटी लागू कराव्यात, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, वयोवृदृध 60 वर्षावरील शेतकऱ्यांना पेंशन मिळालीच पाहिजे, वन्यप्राणी हल्यात मृत शेतकऱ्यांचा वारसांना सरकारी नौकरी देण्यात यावी, विदर्भ राज्य वेगळा करण्यात यावा अश्या विविध मागण्या घेऊन आम आदमी पार्टी तर्फे मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा उपविभागिय कार्यालयावर आल्यावर माेर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी नेत्यांची भाषणे झालीत. त्यानंतर उपविभागिय अधिकारी खेडकर यांना निवेदन देण्यात आले.  

    मोर्चात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेत मालाला भाव नाही, तर शेतकऱ्याचे मत नाही, शेतीला उदयोगाचा दर्जा द्या, जवान मरतो सिमेवर शेतकरी मरतो शेतीवर, जय जवान जय किसान, असेे विविध फलक पकडून शेतकरी मार्चात सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी विविध तालुक्यातील शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!