जिल्हात काँग्रेसच्या बळकटीसाठी कामाला लागा. जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे.

जिल्हात काँग्रेसच्या बळकटीसाठी कामाला लागा.

जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे. 

मूल तालुका काँग्रेस तर्फे कार्यकर्ता बैठक संपन्न.

मूल (अमीत राऊत)

 दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मुल येथे मुल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले.

         या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. सुभाषभाऊ धोटे, जिल्हाध्यक्ष तथा  माजी आमदार राजूरा हे होते तर अध्यक्ष संतोषभाऊ रावत, माजी अध्यक्ष, जि. प. चंद्रपूर तथा संचालक CDCC बॅंक हे होते प्रमुख अतिथी म्हणून मा. घनश्याम येनुरकर, अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमेटी मूल, संजय पाटील मारकवार पं.स.सदस़्य, राकेश रत्नावार संचालक बाजार समिति मूल, संदिप कारमवार उपसभापती बाजार समिती मूल, सौ रुपालीताई संतोषवार, अध्यक्ष, महिला तालुका काँग्रेस कमेटी, मुल, 

रुमदेव मा गोहणे, अध्यक्ष किसान काँग्रेस मुल, गुरुदास चौधरी, अध्यक्ष काँग्रेस ओ बी सी सेल मुल, पतन निलमवार अध्यक्ष युवक काँग्रेस कमेटी मुल

पंकज पुल्लावार, अध्यक्ष, काँग्रेस सेवादल, मा. व्यंकटेश पुल्लकवार, अध्यक्ष शहर युवक काँग्रेस कमेटी मूल आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.

       या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलताना  सुभाष धोटे म्हणाले, काँग्रेस एक विचार आणि आचार यात एकवाक्यता ठेवून चालणारा पक्ष आहे. देशाच्या विकासात पक्षाने भरीव योगदान दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात पक्षाची मजबूत पकड राहिली आहे. मात्र भाजपाच्या खोट्या प्रचाराला बळी पडून आमचा परंपरागत तसेच नव मतदार आपल्या पासुन दूर गेला मात्र मागील पाच वर्षांत त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. त्या सर्वांना काँग्रेसच्या विचारधारेशी पून्हा जोडण्यासाठी आणि वर्तमान सरकारच्या फसवणूक, पिळवणूक, शोषण, भ्रष्टाचारापासून त्यांना मुक्त करण्यासाठी तसेच काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे असे आवाहन केले. या प्रसंगी मुल तालुका काँग्रेस कमिटी तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. 

       या प्रसंगी मुल तालुका काँग्रेस आणि बल्लारपूर विधानसभा काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेसप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!