गोंडपिपरी धाब्यात काँग्रेसला खिंडार, चटप साहेबाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शेतकरी संघटनेत प्रवेश
राजूरा (शब्बीर जागीरदार)
राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मा. अड. वामनराव चटप यांच्या 15 वर्षाच्या कार्यकीर्दीत झालेल्या कामावर विश्वास ठेवून गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील काँग्रेसचे असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेमध्ये बिल्ला लावून अधिकृत प्रवेश घेतला जनसामान्यांच्या प्रश्नाना वाचा फोडणारा नेता दांडगा अनुभव उत्कृष्ट संसदपट्टू सतत जनसंपर्क ठेवणारा नेता म्हणून विकासाच्या मार्गात 10 वर्ष मागे गेलेले राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनता पुन्हा एकदा चटप साहेबाच्या नेतृत्वावर आशेच्या किरणेने बघत आहे. मागील 10 वर्षात लोकप्रतिनिंधीची झालेली ही विफलता असल्याचे प्रखर मत चटप साहेबांनी व्यक्त केलं सतत संघर्ष आणि जनतेच्या पाठींब्याने मी नेता झालो. हा अनुभव माझ्या उरलेल्या आयुष्यात जनतेच्या कामात यावा आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाने येणारी लढाई लढण्यास मी सज्ज असल्याचे स्पष्ट वक्त्यव्य केले.
या प्रसंगी जिल्हा प्रमुख मा. ठाकूरवार सर, शेतकरी संघटना युवा आघाडी अध्यक्ष राजुरा श्री बबनभाऊ उरकुडे, श्री दिलीपभाऊ देरकर नगरसेवक राजुरा,श्री नितीन झाडे,रमेश दुडसे युवा कार्यकर्ते गोंडपिपरी आणि मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!