अतिरिक्त रक्कम देऊन कंत्राट देण्याचा डाव हा कुणाचा इशारा वर
-संदीप गडडमवार यांचा सवाल
सावली(प्रतिनिधी)
सावली नगरपंचायत मध्ये सुरू असलेले कामे ही मोठ्याप्रमाणात कंत्राटदार ला अतिरिक्त रक्कम देऊन केल्या जात आहे हे कुणाच्या इशारा वर केल्या जात आहे असा प्रश्न उपस्तीत करून सावली नगरपंचायत चे वाभाडे काढीत कांग्रेस च्या ताब्यात असलेल्या सावली नगरपंचायत वर टीका करून रोष व्यक्त करीत लवकरच सावलीकर जनता या नगरपंचायत च्या तुलघुली कारभारा विरोधात रस्त्यावर येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कांग्रेस चे जिल्हा अध्यक्ष संदिप गडडमवार यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली.
चंद्रपूर जिल्ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष संदिप गड्डमवार यांनी नगरपंचायत सावली च्या विविध मुद्यावर पत्रकार परिषद घेतलेली असून यात रोजगार हमी योजने मध्ये मजुरांना नगरपंचयातीने रोजगार उपलब्ध करुन दिलेला नसल्याने बेरोजगार यांना बेरोजगारी भत्ता देण्यात यावा अशी मागणी केली. प्रधानमंत्री आवास योजनेतून सावली वासीयांनी घरे उपलब्ध करून देण्यासाठी 500 पैकी फक्त 40 प्रस्तावच वरिष्ठांना पाठविले आहे.मग उर्वरीत सर्व प्रस्ताव का पाठविण्यात आले नाही.ते पाठविण्यात यावे तसेच नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी9.90 % अतिरिक्त दराने निविदा मंजूर करण्यात आले. त्यानुसार 1 कोटी रुपये 14 वित्त आयोगातून देण्यात येत आहे.यात त्यामुळे सदर निविदा रद्द करून फेरणीविदा काढण्यात यावी . सावली नगरात 55 लाख रु रस्ते व नाली बांधकाम कंत्राट गडचिरोली येथील तामशेटवार याना दिली असून निविदा8% अतिरिक्त मध्ये देण्यात आले आहे त्यामुळे सामान्य जनतेचा अतिरिक्त पैसा कंत्राट दाराला देण्यात येत असून हा सावलीकरवर अन्याय आहे. नगरपंचायत च्या मासिक सभेत हायम्यास लाईट लावण्यात येण्यासंदर्भात बहुमत ठराव असतानाही लाईट अजूनही लावण्यात आले नाही. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत निधी प्राप्त असून नही कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले जात नाही तसेच अनेक कुटुंब शोचालय बांधकामापासून वंचित आहे.तसेच ज्यांनी बांधकाम केले त्यांना पैसे सुध्दा देत नाही आहे. नगरातील अतिक्रमण धारकांना स्थायी पट्टे देण्यात आले नाही. नगरातील खुल्या जागेचे सौदारीकारण करण्यात नगर पंचायत अपयशी ठरत आहे. या सामान्य जनतेच्या मागण्या घेऊन पत्रकार परिषद घेण्यात आली.या सर्व मागण्या ला घेऊन सावली कर जनतेसोबत लवकरच नगरपंचायत वर मोर्चा काढू असा इशारा संदीप गडडमवार यांनी दिला. यावेळी विधानसभा अध्यक्ष प्रशांत गाडेवार, तालुकाध्यक्ष अनिल स्वामी, न.प.गटनेते गुणवंत सुरमवार, नगरसेवक राकेश तातकोंडावार, विजय सातरे, सचिन संगीडवार, राजू व्यास प्रामुख्याने उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!