प्रबोधनपर कार्यक्रमाने वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा जयंती साजरी
प्रबोधनपर कार्यक्रमाने वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा जयंती साजरी
संत गाडगेबाबा जनता जनार्दनाच्या दुःखमुक्तीसाठी कळवळणारा महामानव - बंडोपंत बोढेकर
चंद्रपूर (प्रतिनिधी ) - वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा यांनी आपल्या संसाराचा त्याग करून समस्त समाजालाच आपले कुटूंब समजून त्यांना दुःख मुक्तीचा मार्ग सांगितला . कीर्तनाच्या माध्यमातून जनतेच्या अंतर्बाह्य शुध्दीवर त्यांनी भर दिला. अमर्याद कार्यकक्षेचे ओझे घेत समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. जनता जनार्दनाच्या दुःखमुक्तीसाठी कळवळणारा महामानव म्हणजे संत गाडगेबाबा होते , असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.
संत गाडगेबाबा विचार मंच,महाराष्ट्र डेबूजी फोर्स आणि डेबूजी बहुउद्देशीय समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबा यांची १४३ वी जयंती विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक सोमेश्वर मंदिर सभागृहात आयोजित प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला . प्रथमतः पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . त्यानंतर गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा च्या गजरात शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली . भजन मंडळानी सोमेश्वर मंदिर येथून निघून गिरनार चौक ,गांधी चौक जटपुरा गेट ला वळसा देत कस्तुरबा मार्गे सोमेश्वर मंदिर येथे पोहोचली . गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित प्रबोधनपर कार्यक्रमात उदघाटक म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुभाष शिंदे, विद्याताई देवळकर,निशा धोंगडे, अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे धनंजय तावाडे , भाऊराव तुरणकार ,भारती शिंदे, विश्वास गाडीवान होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण भोस्कर यांनी केले तर संचालन पूजा भोस्कर यांनी केले. आभार प्रदर्शन राजेश क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी पन्नालाल चौधरी, विकास भोजेकर, सहदेव राऊत,राजेश क्षीरसागर, अरुण भोसकर, शंकर भोजेकर, नितीन माने,पप्पू काटकर, निकुंज शिंदे , पंकज जोरगेवर,तालिब शेख, जबर शेख,जयश्री राऊत,सविता भोसकर,छाया क्षीरसागर, ललिता भोजेकर यांनी प्रयत्न केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!