पळसगाव बफर वनपरिक्षेत्र कार्यालयावर दगडफेक एस.टि.पी.एफ वनरक्षकांना लाताबुक्यानी मारहाण कक्ष क्रमांक २२४ मधील घटना
पळसगाव बफर वनपरिक्षेत्र कार्यालयावर दगडफेक
एस.टि.पी.एफ वनरक्षकांना लाताबुक्यानी मारहाण
कक्ष क्रमांक २२४ मधील घटना
पळसगाव - प्रतिनिधी
विकास खोब्रागडे
पळसगाव : - चिमुर तालुक्यातील पळगाव वनपरिक्षेत्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असलेल्या पळसगाव बफर झोन मध्ये बफर झोनचे उपसंचालक गुरू प्रसाद हे दौरा करीत असताना कक्ष क्रमांक २२४ मध्ये काही पुरुष,महीला तोडलेले बांबु घेवुन आढळले त्यांना पकडुन ठेवले असल्याची माहीती पळसगाव कार्यालयातील वनरक्षक व एस.टि.पी.एफ वनरक्षकाला सांगन्यात आली त्यानुसार त्यांना ताब्यात घेवुन प्राथमीक कारवाई करन्यात आली. मात्र हि घटना पिपर्डा येथील नागरीकांना माहीत होताच काही नांगरीक दोन चारचाकी वाहनाने पळसगाव बफर कार्यालयावर ध'डकले व समोरचा लोखंडी गेट तोडुन कार्यालयावर दगडफेक केली. हि घटना रविवारच्या रात्री आठ वाजताच्या दरम्यान घडली. पोलीसात तक्रार दाखल केली असता पोलीसांनी आरोपीना अटक केली आहे.
चिमूर पासुन पंचेविस किमी अंतरावर असलेल्या पळसगाव बफर झोन कक्ष क्रमांक २२४ नियत क्षेत्र 1 मध्ये बफर . उपसंचालक यांना दौरा गस्ती दरम्यान आढळलेल्या काही महीला, पुरुष तोडलेले बांबु घेवून येताना दिसल्या वरिष्ठ अधीकाऱ्यांनी सांगीतल्याप्रमाने वनरक्षकांनी देवाजी दळांजे, अनिल मसराम, शंकर नैताम, राजेंद्र खोब्रारागडे, मंगेश नैताम, व चार महीलांना ताब्यात घेवुन पळसगाव बफर कार्यालयात चौकशी सुरू असताना व रात्रीच्या दरम्यान एसटीपीएफचे वनरक्षक कार्यालयाचा गेट बंद करून गस्तीवर जात असताना अचानक पिपर्डा येथील नंदकिशोर गजभिये, सुभाष चुनारकर, दयानंद बोरकर, रूपचंद बारसागडे, दिवाकर मेश्राम, हरिदास चुनारकर, आकाश भेडारे, सुशिल मेश्राम, योगेश बोरकर, धिरज भडांरे, पांडुरंग चुनारकर, अरविंद परचाके, रमेश झोडे, हरिदास सहारे, आदी शंभर ते दिडशे व्यक्तीनी कार्यालयाचा लोखंडी गेट तोडुन हातात लाकडी काटया व दगड घेवुन आत प्रवेश केला. व गस्तीवर जानारे एसटीपिएफचे व वनरक्षकांना लाता बुक्याने मारहान करत त्यांची वर्दी फाडली. व ज्यांना तुम्ही चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्यावर कोनतीच कारवाई करू नका असे सांगुन ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची चौकशी न करू देता त्यांनी सुटका करून घेतली. व प्राणघातक हमला केला. आणी शासकीय कार्यालयाची तोडफोड, तिन शासकीय वाहनाची तोडफोड केली अंदाजे तिन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
फिर्यादीने दिलेल्या तोंडी तक्रारीवरून पोलीसांनी भादवी १४७, १४९, ४५२, ३५३, ३३२, ३३६, १८६,२२५ , ४२७ व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अधिनियम १९८४, ३ प्रमाने गुन्हा नोंद केला असुन आरोपीनां अटक केली आहे. पुढील तपास पो.नि.प्रमोद मडामेच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले, हवालदार किशोर बोढे तपास करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!