चिमूर येथे आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मेळावा
चिमुर - प्रतिनिधी
विलास मोहिनकर
चिमूर :- दिनांक.२४/०२/२०१९ अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र संघटनेच्या वतीने जिल्हा मेळाव्याचे आयोजन चिमूर येथील हुतात्मा स्मारक सभागृहात आज रविवार ला आयोजीत करण्यात आला आहे. .
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्ष अॅड. निशाताई निउरकर, प्रमुख अतिथी कमलताई परुळेकर , महासचिव किसणताई भानारकर , कार्याध्यक्ष चंद्रशेखर शुक्ला , नागपुर जिल्हा कार्याध्यक्ष इत्यादी या मेळाव्याला उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहे. सदर मेळाव्याला परिसरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यानी बहुसंख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष इमरान कुरेशी , माधुरी विर, विदया वारजुकर , प्रभा चामटकर, अन्नपुर्णा हिरादेवे, सिंदु मद्दावार ,लता देवगडे , योगीता गेडाम यांनी केले आहे .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!