सुतार समाजाने संघटित होणे गरजेचे - मानिकराव गहोकर

सुतार समाजाने संघटित होणे गरजेचे

- मानिकराव गहोकर


चिमूर - प्रतिनिधी

       विलास मोहिनकर


चिमूर : - शंकरपुर सुतार समाज हा गावागावात विखुरलेला आहे त्यांच्या पर्यन्त शासनाच्या विविध योजना पोहचत नाही त्यामुळे सुतार बंधवानी एकत्र येऊन आचार विचारांची आधान - प्रधान करुन समाजाने संघटित होने आवश्यक आहे.तसेच जग बदलत चालले आहे त्यानुसार सुतार समाजाने बदलून स्वतःची प्रगती साधावी असे आव्हान महाराष्ट्र विश्वकर्मा मयत्मज सुतार महांसघाचे माजी महासचिव मानिकराव गहोकार यानी केले.  ते श्री, प्रभू विश्वकर्मा सुतार समाज संघटना,शंकरपूर यांच्या वतिने श्री प्रभू विश्वकर्मा  जयंति व  सुतार समाज संघटना प्रबोधन मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते या मेडाव्याचे उदघाटन  चिमूर विधानसभा युवक कांग्रेस उपाध्यक्ष तथा चिमू पं. स.गट नेता रोशण ढोक,, चंद्रपूर जिल्हा सर्वोदय मंडळ चे जिल्हा सचिव ईश्वरराव गहूकर,चिमूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा प्रभु विष्वकर्मा संघटनेचे अद्यक्ष अमोद गौरकर,सेवानिवृत वनपरीशेत्र अधिकारी जगनाथजी गहुकर ,सुरेशजी वांढरे,सुधाकरजी मुरस्कर, शामरावजी झोडे भुयार,नीलकंठ शास्त्रकार आदि मान्यवर उपस्थित होते याच मेडाव्यात काष्ट कलाकार महादेव बोरीकर  गुणवंत विद्यार्थी प्रीति शास्त्रकार सूरज अंड्रास्कर मोहिनी दारव्हनकर वैशाली शास्त्रकार या विद्यार्थ्यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संचालन युवराज मुरस्कर प्रस्ताविक अमोद गौरकर आभार मोहिनी गौरकर यानी केले. यशस्वीतेसाठी अशोक गहुकर वसंता गहुकर नरेंद्र वांढ़रे  विनोद वांढरे, रामदास वांढरे,भास्करजी वांढरे,प्रदिप राखुडे , कृष्णजी दारुनकर आदिंनी प्रयन्त केले. या मेडाव्याला समस्त सुतार समाज बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!