दरळ कोसळून दोन मजूर ठार, एक गंभीर

ब्रेकिंग न्यूज

मूल (अमित राऊत)

 मूल तालुक्यातील चिचाळा या गावात शेतीसाठी सिंचन पुरविण्याकरीता चांदा ते बांदा या धर्तीवर हा प्रकल्प आधारीत असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सदर प्रकल्प चिचाळा या गावात प्रगतीपथावर असतांनाच आज कामावर काम करीत असतांना दोन मजूरांचा दरड कोसळून जागीच करून अंत झाला. असून एक गंभीररीत्या जखमी आहे.

   मृतकाचे नाव हरीदास मनोहर दुधबळे वय 42 रा. चिचाळा जिल्हा चंद्रपूर , रविंद्र प्रेमलाल उईके वय 30 रा. छिपिया जिल्हा गोंदिया आणि गजानन मुर्लीधर मेश्राम  वय 45 रा.चिचाळा जिल्हा चंद्रपूर हा गंभीर जखमी आहे. याला चंद्रपूर येथिल कोलसिटी रूग्णालयात हलविले आहे.काम व्यवस्थित सुरू नसल्याचेही बोलल्या जात आहे.   

  ही घटना आज दिनांक 23 ला सकाळी 10 वाजताच्या सुमारास अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या दत्तक गावात घडली असून सदर घटनेने गावकरी हादरले आहे. सोबतच मजूरांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

   चिचाळा व लगतच्या सहा गावांना शेतीला सिंचन सुविधा पुरविण्याकरीता चांदा ते बांदा या धर्तीवर 23 कोटी 47 लाख 54 हजार रूपये निधी खर्च करून याचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचा फायदा चिचाळा व लगतच्या सहा गावांच्या शेतीकरीता होणार आहे.

  मृत पावलेल्या कुटूंबियांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कडून 10 लाख रूपयाची मदत घेषित केली असून घटनास्थळी कंपनीकडून 50 हजाराची आथिक मदत कुटूंबियांना दिली आहे. 

तसेच कंपनीकडून इंन्शूरंस व आर्थिक मदत म्हणून 4 लाख 50 हजार रूपये 10 दिवसाचे आत देण्यात योणार असल्याचे सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!