जिवती तालुक्यात अवैध दारूचा महापूर

जिवती तालुक्यात अवैध दारूचा महापूर

जिवती (शब्बीर जागीरदार)

माणिकगड पहाडावरील जिवती तालुक्यात अवैध दारूचा महापूर वाहत असून या अवैध दारू विक्री करणाऱ्याकडे सध्या घडीला पोलिस विभागाचा आणि अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष पणा जनवत असून अवैध दारू विक्रेते अवैध रित्या दारू आणण्यासाठी रान मोकळे झाले आहे, जिवती तालुका हा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून तेलंगणा राज्याची सिमा लागून असल्यामुळे अवैध दारू आणली जात आहे याची माहिती पोलिसांना असून सुद्धा कारवाई केली जात नाही याचे कारण असे आहे की ज्या दारू वाल्याकडून पोलीसांना हप्ता मिळतो त्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात नसुन जे दारू विक्रेते पोलिसांना हप्ता देत नाही अश्या दारू विक्रेत्यांवर धाडी टाकून कारवाई करण्यात येते अशी चर्चा दारू विक्रेत्यांकडून ऐकण्यात येते आहे. अवैध रित्या दारू आणण्याचे मार्ग,येल्लापूर, लेंडीगुडा, भारी ,बंडाकासा , स्वाती, भाईपठार , देवाडा ते भेंडवी घाट या मार्गाने दारू आणली जाते हि सर्व माहिती पोलिसांना असून या बाबींकडे दुर्लक्ष केले जाते . ग्राहकाने मोबाईल काल केलाकी जाग्यावर दारूची सुविधा पुरविण्यात येत काही शासकीय ठिकाणी कर्मचार्यांनी फोन केला की कार्यालयात पण दारू विक्रेते दारू आणून देतात या दारूविक्री करणार्यांना काही पोलीसांनची मदत असल्याची चर्चा जनता करीत आहे.अवैध दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या जनतेच्या माध्यमातून करण्यात येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!