सावली बाजार समिती कर्मचारी आज पासून संपावर
सावली बाजार समिती कर्मचारी आज पासून संपावर
अडते संघटनेचा पाठिंबा
सावली(प्रविण झोडे)
राज्यातील सर्व बाजार समितीतील सचिव ते शिपाई,हंगामी व रोजनदारी वरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे या मागणी साठी गुरुवार दिनांक 28 ला मुंबई येथे आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन होत असून त्याला सावली बाजार समिती ने पाठिंबा देत आंदोलनात सहभागी झाली आहे.
राज्यातील 307 बाजार समिती मध्ये 6877 कर्मचारी कायम व हंगामी कार्यरत आहे.महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचा माध्यमातून या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा या करिता शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.शासन निर्णया नुसार 14 जून 2017 ला अभ्यास समिती गठीत करून अहवाल मागविण्यात आला होता.अभ्यास समिती ने 20 नोव्हेंबर 2017 रोजी अहवाल सादर केला दरम्यान शासनाने पणन संचालकांचा अहवाल ही 1 सप्टेंबर 2018 रोजी शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे.असे असताना ही शासन योग्य निर्णय घेत नसल्याने मुबंई येथील आझाद मैदानावर दिनांक 28 पासून बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून सावली बाजार समिती आज पासून संपावर जात आहे या संदर्भात प्रभारी सचिव दिनकर घेर,विश्ववनाथ कुमरे,अशोक ठाकरे,दिवाकर गावडे,नरेश सुरमवार,उमाजी पिपरे, रमा भेरीवार, वनिता नागोसे,प्रमोद ननेवार व रोजंदारी कर्मचारी यांनी जिल्हा उपनिबंधक चंद्रपूर,सहायक निबंधक सावली , तहसीलदार सावली,पोलीस स्टेशन सावली यांचा मार्फत शासनाला निवेदन पाठविले आहे.
या आंदोलनाला सावली तालुका अडते संघटनेने पाठिंबा दर्शविला असून सावली,व्याहडखुर्द,पाथरी येथील यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे बाजारपेठत शुकशुकाट आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!