वरोरा येथे शेतकरी मोर्चाचे आयोजन

 
आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय धडकणार मोर्चा

वरोरा तालुका सेवा सरकारी संस्था समितीचे आयोजन

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - तालुक्यातील शेतकरी शेतमजूर तसेच कामगारांच्या विविध मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुका सेवा सरकारी संस्थांच्या वतीने मंगळवारी भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले हा मोर्चा आंबेडकर चौक येथून तहसील कार्यालय वरोरा येथे धडकणारा असून शासनाच्या जाचक कटीमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असलेला आरोप आयोजकाकडुन  करण्यात येत आहे.

शासनाने दुष्काळ परिस्थितीमध्ये दिवाळीमध्ये फक्त पाच हजार रुपयाची मदत देण्याचे आश्वासन दिले मात्र प्रत्यक्षात दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असून शेतकऱ्यांची आत्महत्याचे प्रमाण वाढत चाललेली असल्यामुळे चिंतेचा विषय बनलेला आहे.

या मोर्चामध्ये प्रमुख मागण्या ठेवण्यात आले असून त्यामध्ये शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत नेहमी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येणार असून त्याऐवजी मार्च 2026 2027 कर्जातून दोन लाखापर्यंत कर्जमुक्ती देण्यात यावी, 2001 ते 2026 पर्यंत या कालावधीत असणारा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा तसेच काही शेतकरी ते मागील तीनही कर्जमाफी मध्ये सुटली असल्याने त्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, सध्याच्या परिस्थितीत दुष्काळ जाहीर झाला असून सरकारने 12 तास विद्युत पुरवठा सुरू केली असून सुद्धा शेतकऱ्यांना सहा तास सुद्धा विज पुरवठा मिळत नसल्यामुळे हा विद्युत पुरवठा 24 तास शेतकऱ्यांना देण्यात यावा, लाल नाला व इतर धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचण्यासाठी सरकारने नियोजन करून शेती, जनावरे,पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, सेवा सहकारी संस्थाच्या प्रतीसाठी ग्रामपंचायतीस, ग्रामसेवकांचा पगार तसेच शासकीय अनुदान ग्रामपंचायतला दिला जातो परंतु शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या सेवा सहकारी संस्थेला गट सचिवाचा पगार व सानूग्रह अनुदान मिळत नसल्याने ह्या सेवा सहकारी संस्था भरभराटीस नेण्यास शासन तसेच सहकार क्षेत्राने पुढाकार घेऊन ह्या सेवा सहकारी संस्थेचे आर्थिक उत्पन्न वाढीस सरकारकडून मदत करण्यात यावी,, याकरता ह्या मोर्चा असून तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी कामगार बंधूंनी उपस्थित राहण्याची आवाहन बाजार समिती संचालक अभिजीत पावडे तसेच आदिवासी कार्यकारी सेवा सहकारी संस्था चारगाव बु. सभापती दयारामजी ननावरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!