मधुमक्षिका पालन व्यवसाय बद्दल महिलांना प्रशिक्षण
30 महिलांनी घेतला प्रत्यक्ष प्रत्याशिकाचा अनुभव
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ व आत्मा चंद्रपूर द्वारा शेगांव बु. येथे मधुमाक्षिका पालन व्यवसाय प्रात्यक्षिक प्रशिक्षण सत्र संयुक्त ऍग्रो फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड शेगाव यांच्या कार्यालयात 30 महिलांकरिता मधुमक्षिका पालन व्यवसाय प्रात्यक्षिक व प्रशिक्षण याचे 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर पर्यंत पाच दिवसाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सातेरी मधमाशांचे कॅप्चरिंग करण्याकरिता दि. 30 ऑक्टोबर ला फील्ड विजिट करून प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळाचे मध निरीक्षक व्हि. पी. कुंभारे यांनी मानोरा व शेगाव खुर्द येथील शेत शिवारात नेऊन या सर्व 30 महिलांना मध मक्षिका संगोपन करणे व त्या मधील राणी माशी, कामगार माशी, सैनिक माशी, नर माशी हे ओडखून त्यांना कशा प्रकारे ओडखायचे व त्या पासून मिळणारे सहद कशा प्रकारे कढायचे या सर्व प्रकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!