शेगाव बु.मधील मस्कऱ्या गणपती विसर्जन उत्साहात संपन्न

डिजे व ढोल ताश्याच्या तालावर नाचत भावी भक्तांनी दिला लाडक्या बाप्पाला निरोप

विविध राजकीय पक्षांकडून गणेश मंडळाचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव बू येथे दरवर्षी मस्कऱ्या गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहाने साजरी केल्या जाते. येथील विसर्जन वरोरा तालुक्यातील प्रथम क्रमांकावर असते. त्यामुळे परिसरात विसर्जन करिता नामांकित आहे विशेष म्हणजे शेगाव बु. नगरी मध्ये " मूर्ती लहान कीर्ती महान " अशी परंपरा कायम असुन प्रत्येक मस्कऱ्या गणेश मंडळांचा लाखो रुपयांचा खर्च असून आपला गणेश मंडळ सर्वाधिक सुशोभित कसा दिसेल याकडे प्रत्येक मंडळाचे अधिकाधिक लक्ष असते.  तेव्हा सर्वस्वी मंडळ डीजे , ढोल ताशे , सुशोभित बाप्पाची मूर्ती, वेगवेगळ्या झाकी तयार करून  अनेक उपक्रमाने शेगाव नगरी तसेच परिसरातील नागरिकांचे मने मोहून टाकतात. त्यामुळे येथे परिसरातील हजारो गणेश भक्त शेगाव मध्ये लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी दाखल होऊन या आनंदक्षणी सहभागी होतात.  
या वर्षी मिरवणुकी वर्षी  असलेल्या गोरिला चे वेश घेतलेला गोरिला डान्स हा ग्रामीण भागातील लहान मुलांना तसेच भाविकांसाठी विशेष आनंदाची, आकर्षणाचा भाग ठरलेला होता.विसर्जन पाहण्याकरिता परिसरातील लाखो भाविक येत असल्याने या आनंदमय सुखमय क्षणी काही विपरीत घडू नये यासाठी शेगाव येथील ठाणेदार निशा भुते याचे मार्गदर्शनात बल्लारपूर, राजुरा, राठी, ढाबा, तसेच चिमूर येथील पोलीस कर्मचाऱ्यासहित,होमगार्ड ची चौका चौकात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता.

तसेच येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद प.स. व ग्रापंचायत निवडणूक करीता विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी आपापले पेंडाल लावून सर्व गणेश मंडळाचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. तसेच जामा मस्जिद व शांतता कमेटी व  शेगाव बु. पोलीस यांचे कडून सुद्धा सगळ्या गणेश मंडळाचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 
 
यावेळी वरोरा, भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करणभाऊ संजय देवतळे सर्व गणेश मंडळाला भेट देऊन लाडक्या गणेश बाप्पाला निरोप दिला तसेच विसर्जन मिरवणुकीत मध्ये एकूण 14 गणेश मंडळांनी सहभाग घेतला,अखेर हे विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी गावकऱ्यांनी मोठे सहकार्य केले.तसेच ग्रामपंचायत प्रशासक शेगाव, शेगाव पोलीस स्टेशन, शांतता कमेटी, तंटा मुक्त समिती, गावकरी तसेच राजकीय कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य करून मस्कऱ्या गणेश विसर्जन मोठ्या उत्साहाने व शांततेत पार पाडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!