गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रतिबंधित डीजेचा वापर; सिंदेवाही पोलिसांची कारवाई

डिजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकारिणीवर गुन्हा दाखल; १५.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा पवनपार, ता. सिंदेवाही येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मीडियाचा वापर केल्याप्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी कारवाई केली. आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकारिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी पवनपार येथे नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मीडियाचा वापर करण्यात आला. याप्रकरणी दोन पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकारिणीविरुद्ध पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे अपराध क्रमांक. ५७०/२६, कलम २२३, ३(५) भारतीय न्याय संहिता तसेच कलम ३८(१), १३६, ७० महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण १५ लाख ३५ हजार रुपयांचा डीजे व इतर साहित्य तसेच वाहन जप्त केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांचन पांडे, सिंदेवाही पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

कारवाईमध्ये पोलीस अंमलदार संजय जुगनाके, नारायण येगेवार, शुभम उराडे, कमलेश फेंडर, सुनील बहेकार व नंदकिशोर तुमराम यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!