प्रवीण चिचघरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण



वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
पोंभुर्णा : प्रतिनिधी — वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रवीण चिचघरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
या वृक्षारोपण कार्यक्रमाला भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, पोंभुर्णा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सुलभाताई पिपरे, तालुका आरोग्य अधिकारी बावणे, कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णाचे रविंद्र गेडाम, संचालक नैलेश चिंचोलकर, माजी सरपंच नवेगाव (मोरे) राजेंद्र मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश गव्हारे, माजी सरपंच जामखुर्द बंडूभाऊ बुरांडे, अज्जुभाऊ कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी अजहर मलक, सुरज डुकरे, दीपक मैसकर आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिल्याबद्दल उपस्थितांनी प्रवीण चिचघरे यांचे कौतुक केले. वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबविण्याची ही संकल्पना इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!