खडसंगीतील बेमुदत धरणे आंदोलनाला निलेश कराळे सरांची भेट
आंदोलकांशी साधला संवाद; ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांची जाणून घेतली माहिती
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील खडसंगी ग्रामपंचायतीच्या विविध प्रश्नांसह प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला निलेश कराळे सर यांनी भेट देत आंदोलक व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेत आंदोलनामागील प्रमुख मागण्या व प्रश्नांची माहिती घेतली.
आंदोलकांनी ग्रामपंचायतीशी संबंधित विविध प्रश्न, ग्रामसभेत मांडण्यात आलेल्या मागण्या, चौकशी तसेच प्रशासनाकडून अपेक्षित असलेल्या कार्यवाहीबाबत निलेश कराळे सर यांना माहिती दिली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनीही आपल्या विविध समस्या व अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या.
निलेश कराळे सर यांनी आंदोलनकर्ते व ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या भेटीमुळे आंदोलनस्थळी सुरू असलेल्या चर्चेला अधिक चालना मिळाली.
दरम्यान, ग्रामस्थांच्या प्रश्नांवर ठोस व लेखी कार्यवाही होईपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या मागण्यांवर कोणती कार्यवाही केली जाते, याकडे खडसंगी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
“ग्रामस्थांच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी पारदर्शक चौकशी करून ठोस कार्यवाही होणे आवश्यक आहे,” अशी भूमिका आंदोलनस्थळी व्यक्त करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!