नैसर्गिक आपत्तीने बाधित शेत पिकांची तहसीलदारांकडून पाहणी

तहसीलदार श्रीधर राजमाने यांची गौरखेडा रिठ येथे प्रत्यक्ष पाहणी; नुकसानीची घेतली माहिती

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तहसील चे तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी आज बुधवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी मौजा गौरखेडा रिठ येथे भेट देऊन नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतशिवारात जाऊन तहसीलदार राजमाने यांनी नुकसानीची पाहणी केली तसेच संबंधित शेतकऱ्यांकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. यावेळी नुकसानग्रस्त पिकांची स्थिती, बाधित क्षेत्र आणि नुकसानीचे स्वरूप याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शासनाच्या नियमानुसार नुकसानीचे पंचनामे व पुढील आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून पाहणी करण्यात येत आहे.
तहसीलदारांच्या प्रत्यक्ष पाहणीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाकडून नुकसानीची दखल घेतली जात असल्याचा दिलासा मिळाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!