सावित्रीबाई फुले विद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा

विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायदा व MKCLच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - सावित्रीबाई फुले विद्यालय,पवनी येथे २८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये माहिती अधिकार कायद्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी तसेच पारदर्शक प्रशासनाचे महत्त्व समजावे,या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून नंदा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक संजय नंदागवळी तसेच अरुणा कांबळे यांची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना माहितीचा अधिकार कायदा, त्याची अंमलबजावणी, नागरिकांची माहिती मिळविण्याची प्रक्रिया व पारदर्शक प्रशासनातील माहिती अधिकाराचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.संजय नंदागवळी यांनी MKCL अंतर्गत उपलब्ध मोफत प्रशिक्षण,विविध अभ्यासक्रम व शैक्षणिक योजनांची माहिती देत विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राज्य शासन पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक संदीप मुंडले, ललिता डेकाटे,अर्चना दडवे, स्मिता मोहरकर,प्रतीक रंगारी, सुमय्या शेख तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

“माहितीचा अधिकार म्हणजे सक्षम नागरिकत्वाची पायाभरणी” या संदेशातून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!