विज्ञान नाट्योत्सवात डॉ. आंबेडकर हायस्कूलचा डंका!
१४ शाळांमध्ये प्रथम क्रमांक; ‘महासागराचे पुनरुज्जीवन–पिढ्यांचे जतन’ नाट्याला परीक्षकांची दाद
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.४/०९/२०२६ पं.स.पवनीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा २०२६-२७ न.प. लालबहादूर शास्त्री प्राथ.शाळा, पवनी येथे उत्साहात पार पडली. तालुक्यातील तब्बल १४ शाळांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत डॉ. आंबेडकर हायस्कूल,पवनीने प्रथम क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश संपादन केले.
डॉ. आंबेडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘महासागराचे पुनरुज्जीवन–पिढ्यांचे जतन’ या विषयावर प्रभावी नाट्य सादर केले.विज्ञानविषयक संकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन,पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख समन्वय साधत विद्यार्थ्यांनी केलेल्या नाट्यसादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.विद्यार्थ्यांचा अभिनय, संवादफेक,आशयपूर्ण मांडणी आणि प्रभावी सादरीकरण यामुळे परीक्षकांनी या नाट्याला प्रथम क्रमांक घोषित केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पवनी न.प.मुख्याधिकारी निलेश इंगोले तर प्रमुख अतिथी प्रशासन अधिकारी आरिफ शेख,केंद्र प्रमुख दौलत मसराम,शि.वि.अधिकारी
नरेश चांडक उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण प्रा.दीप्ती हुमे, मुख्याध्यापक श्रीकृष्ण कावरे,विषय साधनव्यक्ती दीपाली बोरीकर यांनी केले.
स्पर्धेत गांधी विद्यालय,कोंढा यांनी द्वितीय, तर पी.एम. श्री. जि. प. हायस्कूल, आसगाव यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधनव्यक्ती डॉ.मुरलीधर रेहपाडे, यांनी तर प्रास्ताविक मंजुषा दलाल यांनी केले.तर आभार भोजराज पडोळे यांनी मानले.
या उल्लेखनीय यशाबद्दल भारत सेवक शिक्षण संस्थेचे सचिव विकास राऊत,अध्यक्ष अवनती राऊत,सदस्य संघर्ष राऊत, विद्यालयाचे मुख्याध्यापक विवेक गायधने,सरिता जाधव,विद्यालंकार राऊत,सीमा जिभकाटे,जयश्री मोहरकर,सिद्धांत राऊत,वीरेंद्र मेश्राम,चंद्रशेखर ईखार,तुषार भोगे, अंजली जांभूळकर,कैलास जांभुळे,वाहिद खान,रोहन भोगे, ऋतुजा तिरपुडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या यशामुळे डॉ. शआंबेडकर हायस्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून,विज्ञानविषयक जिज्ञासा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!