जन्माष्टमीनिमित्त नवभारत कन्या विद्यालयात वेशभूषा स्पर्धा
जन्माष्टमीनिमित्त नवभारत कन्या विद्यालयात वेशभूषा स्पर्धा
विद्यार्थिनींनी साकारल्या श्रीकृष्ण, राधा अन् यशोदेच्या भूमिका; विद्यालयात उत्साहाचे वातावरण
मूल : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नवभारत कन्या विद्यालय, मूल येथे आज वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बहुसंख्य विद्यार्थिनींनी श्रीकृष्ण, राधा आणि यशोदा यांच्या आकर्षक वेशभूषा साकारत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.
मुख्याध्यापिका अल्का वरगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कलाशिक्षक कार्तिक नंदुरकर यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा, हावभाव आणि सादरीकरणातून जन्माष्टमीचा उत्सव अधिक रंगतदार केला.
स्पर्धेच्या आयोजनासाठी ज्येष्ठ शिक्षक संतोष गव्हारकर आणि धीरज धोडरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रभावी संचालन विद्यार्थिनी श्रावणी गुरूणुले आणि स्वरा रामटेके यांनी केले.
जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यालयाच्या परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थिनींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाल्याने पालक व शिक्षकांकडूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!