नेहरु विद्यालयात शिक्षक पालक सभा संपन्न
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - शेगाव येथील नेहरु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव बु. येथे नुकतेच शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले. यात विविध समीती गठीत करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेरखान पठान होते तसेच प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यापक मिलमिले जेष्ठ शिक्षक ढाकुणकर, चांगले, वारे होते. प्रथम सर्व शिक्षकांचा व पालकांचा परिचय करण्यात आला. यात शिक्षक पालक समिती गठीत करण्यात आली. समितीचे अध्यक्ष चाफले सचिव मुख्याध्यापक मिलमिले तसेच उपाध्यक्ष म्हणून सौ शंकर यांनी पदभार स्वीकारला. या सभेत पालकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उरकुडे यांनी तर प्रास्ताविक गिरडे तर आभार सौ लोडे यांनी मानले. सभेला शंभरहून अधिक पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहार झाली कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!