'DD SPICES’मधून महिलांना गृहउद्योगाची नवी दिशा

गुरुकुल CPS फाउंडेशन व नवदुर्गा बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र संपन्न

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.१९/०९/२०२६ महिलांना घरातूनच गृहउद्योग सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच दर्जेदार खाद्यपदार्थ व मसाले ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘गुरुकुल CPS फाउंडेशन’ आणि ‘नवदुर्गा बचत गट’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘DD SPICES’ उपक्रमांतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांसाठी  दि.१३ सप्टेंबर रोजी पवनी येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

या चर्चासत्राला नवदुर्गा बचत गटाच्या मुख्य संचालिका छवी धमदे,उपाध्यक्षा भारती धकाते,सचिव दुर्गा देविकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी महिलांना मसाला निर्मिती, उत्पादनाची गुणवत्ता,स्वच्छता, आकर्षक पॅकिंग,ब्रँडिंग,मार्केटिंग तसेच विक्री व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

‘DD SPICES’च्या माध्यमातून दर्जेदार,स्वादिष्ट,सुगंधी आणि गुणवत्तापूर्ण मसाले ग्राहकांपर्यंत पोहोचविताना स्थानिक महिलांच्या उद्योजकतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे,गृहउद्योगाला व्यावसायिक स्वरूप देणे तसेच भविष्यात विविध कंपन्या व संस्थांच्या सहकार्याने व्यवसायवृद्धीच्या संधी निर्माण करणे,या विषयांवरही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी गुरुकुल CPS फाउंडेशनचे संचालक रवी भिसेकर, राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी,यांच्यासह बचत गट सदस्या देविता खडगी,तेजस्विनी पारधी, अल्का काटेखाये,योगिता सावरबांधे,लता मसराम,माधुरी हरडे,शारदा काटेखाये,इंदु काटेखाये,प्रतिभा काटेखाये,सुनंदा निर्वाण,हर्षा पेटकर आणि अर्चना दडवे आदी महिला उपस्थित होत्या.

‘DD SPICES’च्या माध्यमातून महिलांना केवळ मसाला व्यवसायाची संधी नव्हे,तर स्वतःची स्वतंत्र व्यावसायिक ओळख निर्माण करण्यासाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध होत आहे. ‘स्वतःसाठी काहीतरी करण्याची सुरुवात आजच करा’ असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!