महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या भंडारा जिल्हा संघटकपदी जयेंद्र चव्हाण यांची नियुक्ती

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - पवनी तालुक्यातील   केसलवाडा येथील रहिवाशी तथा लोकवाद न्युज वेबपोर्टल चे  भंडारा जिल्हा प्रतिनिधी जयेंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई भंडारा जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जयेंद्र चव्हाण यांची संघटक पदी नियुक्ती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश अध्यक्ष (निवड समिती )प्रा. महेश पानसे यांचे सुचनेनुसार पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.

जयेंद्र चव्हाण यांनी पत्रकारिता क्षेत्रात त्याचप्रमाणे विविध सामाजिक,शैक्षणिक तसेच स्थानिक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली आहे.त्यांच्या नियुक्तीमुळे भंडारा जिल्ह्यातील पत्रकार संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

जयेंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या भंडारा जिल्हा संघटकपदी नियुक्ती झाल्याबद्दल पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मित्र मंडळींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!