सावित्रीबाई फुले विद्यालयात अबॅकस कार्यशाळा व प्रशिक्षण उत्साहात

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि. २८/०८/२०२६ विद्यार्थ्यांमध्ये गणितीय कौशल्ये विकसित करण्यासोबतच एकाग्रता, स्मरणशक्ती आणि तर्कशक्ती वाढावी, या उद्देशाने OBNच्या वतीने सावित्रीबाई फुले विद्यालय, पवनी येथे एकदिवसीय अबॅकस कार्यशाळा व प्रशिक्षण नुकतेच उत्साहात पार पडले.

कार्यशाळेच्या प्रारंभी प्रशिक्षणाचे सुलभक अजय निनावे यांचे विद्यालयाच्या वतीने राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली.

यावेळी सुलभक अजय निनावे यांनी सहभागी प्रशिक्षणार्थींना विविध गणितीय ट्रिक्स, संख्यांची स्थानिक किंमत, जलद गणिती प्रक्रिया तसेच Brain Boosting Activities याबाबत प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले. अबॅकसच्या माध्यमातून गणित विषय अधिक सोपा, रंजक आणि कृतीशील पद्धतीने कसा शिकता येतो, याचे विविध उपक्रमांतून प्रशिक्षण देण्यात आले.

सलग चार तास चाललेल्या या प्रशिक्षणात शिवाजी बिलवणे, काजल नाकाडे, ट्विंकल कुकडे, कविता बिलवणे आणि शितल नखाते यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे गणिताकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन एकाग्रता व विचारक्षमता वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!