राष्ट्रीय/राज्य पुरस्कृत आदर्श शिक्षक असोसिएशनची सभा संपन्न
पुरस्कृत शिक्षक यांच्या हक्कासाठी लढणार - डॉ.प्रदिप बिपटे राज्याध्यक्ष
ओमप्रकाश गायधने विभागीय अध्यक्ष तर दशरथ जिभकाटे जिल्हाध्यक्षपदी नियुक्त
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि. २९/०८/२०२६ राष्ट्रीय/राज्य पुरस्कृत आदर्श शिक्षक असोसिएशन, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने नुकताच भंडारा जिल्ह्याचा दौरा करण्यात आला. यावेळी भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य पुरस्कृत आदर्श शिक्षकांशी विविध शैक्षणिक, सामाजिक तसेच शिक्षकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत भंडारा येथील ओमप्रकाश गायधने यांची विभागीय अध्यक्षपदी, तर दशरथ जिभकाटे यांची भंडारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांचे उपस्थित शिक्षकांनी उत्स्फूर्त स्वागत करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
सभेला संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. प्रदीप बिबटे,राज्य सरचिटणीस, बळीराम चापले,राज्य कोषाध्यक्ष सुनिल नायक,राज्य कार्यकारिणी सदस्य रामप्रसाद मस्के तथा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यातील सुमारे ५० राष्ट्रीय व राज्य पुरस्कृत आदर्श शिक्षकांनी सभेला उपस्थित राहून विविध विषयांवर आपली मते मांडली.
प्रास्ताविक राज्य सरचिटणीस बळीराम दादाजी चापले यांनी केले.राज्य कोषाध्यक्ष सुनिल नायक यांनी संघटनेची भूमिका व भविष्यातील कार्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळीक राज्याध्यक्ष डॉ.प्रदीप बिबटे यांनी राष्ट्रीय व राज्य पुरस्कृत शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले.महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कृत शिक्षकांना ओळखपत्र,बस प्रवासात सवलत, विविध शासकीय समित्यांवर प्रतिनिधित्व तसेच दोन वेतनवाढीबाबत सकारात्मक प्रयत्न करून राज्यस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
या सभेला ओमप्रकाश गायधने, दशरथ जिभकाटे,डॉ.युवराज खोब्रागडे,अशोक गिरी,मनोहर पारधी,खुशाल डोंगरवार,सोनवणे, राठोड,अंकित भगत,प्रफुल्ल देशमुख,संदीप आडे,संदीप वहीले,पुंडलिक थाटे,मेघश्याम जंजाळ यांच्यासह भंडारा जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय व राज्य पुरस्कृत आदर्श शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमप्रकाश गायधने यांनी केले,तर रामप्रसाद मस्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.या बैठकीमुळे भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य पुरस्कृत शिक्षकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध होऊन त्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!