प्रा. महेश पानसे यांचा क्लब ने केला सत्कार



मूल : – महाराष्ट्रातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघटना पैकी एक असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या प्रदेशाध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार आणि संघटनेचे जेष्ठ पदाधिकारी प्रा. महेश पानसे यांची नियुक्ती करण्यात आली गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी व राज्यसंघटक संजय भोकरे यांच्या सुचनेनुसार प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी प्रा. महेश पानसे यांच्या नियुक्तीचे आदेश दिले.
गेल्या 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघात राहुन त्यांचे संपूर्ण विदर्भात संघटनेची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
तसेच 30 वर्षापासून त्यांनी विविध अग्रगण्य वृत्तपत्रामधून परिपक्व व अभ्यासपूर्ण पत्रकारिता करत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
पत्रकार संघटनेच्या माध्यमातून विदर्भातील शेकडो तरुण पत्रकारांना पुढे आणण्याचा त्यांचा मोलाचा वाटा आहे. प्रा महेश पानसे यांची प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रेसक्लब मुलच्या वतीने त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला व पुढ्च्या वाटचालीस भरभरुन शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार प्रसंगी प्रेस क्लब चे पदाधिकारी नासिर खान, विजय सिद्धावार, निलेश रॉय, आनंदराव कुळे, रोहीत कामडे, दत्तात्रय वाराणशिवार, सतीश राजूरवार, धर्मेंद्र सुत्रपवार, कुमुदिनी भोयर तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष चिताडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!