महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे अन्नदान.


 महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे   अन्नदान.
       समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण  आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे मंगळवार दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी स्व.चंद्रचूड येनूरकर विद्यालय, चिखली, त. मुल येथे अन्नदान करण्यात आले.
        महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात. 
       विद्यार्थ्यांना सकस आणि समतोल आहार मिळावा या हेतुने  न्यासातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
     न्यासाच्या वतीने सौ . गिता कोंतमवार यांनी परिश्रम घेतले .
      या उपक्रमासाठी  शाळेच्या मुख्यध्यापिका सौ . अर्चना येनूरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले .         
                

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!